‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेते म्हणजे समीर चौघुले. अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. आज समीर चौघुले त्यांचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर समीर चौघुलेंबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, अभिनेता प्रसाद ओक, समीर चौघुले यांच्याबरोबर उभी असल्याचे दिसत आहेत.
आणखी वाचा : “माझा आता कोणताही संबंध नाही…” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने दिला राजीनामा
प्राजक्ता माळीची पोस्ट
“दुग्धशर्करा योग..!
आषाढी एकादशीला तूझा ५० वा वाढदिवस आला…
खरचं…, सगळ्या जगाला हसवण्यासाठी आलेला तू देवदूतच आहेस…
तूझ्यामुळे माझ्या दाद देण्याला ओळख मिळाली…
आणि मी “वाह् दादा वाह् fame- प्राजक्ता” झाले.. आणि ही ओळख आयूष्यभर राहील, असं वाटतं.
.
तू अतिशय कष्टाळू, नम्र, भाबडा आणि अवलिया कलाकार आहेस; तूला आत्तापर्यंत मिळालेलं यश,प्रेम ही तर फक्त सुरूवात ठरो.., आणि इथून पुढे देवाचा आशिर्वाद आणि प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावर धुव्वाधार बरसत राहो; ह्याच तूला ५० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!” अशी पोस्ट प्राजक्ता माळीने केली आहे.
आणखी वाचा : “दैवं सुद्धा कधी कधी कळसच गाठतं, नाही का?” कुशल बद्रिकेची पोस्ट; म्हणाला, “वारकरी नुसतं कळसाच्या पाया पडून…”
दरम्यान प्राजक्ता माळीच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तर काहींनी समीर चौघुलेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ता माळीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.