मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरेला ओळखले जाते. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेद्वारे तिने पुन्हा मालिकाविश्वात पदार्पण केले. तिची ही भूमिका प्रचंड गाजली. नुकतंच प्रार्थनाने वजन आणि प्रेम याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

प्रार्थना बेहेरे ही इन्स्टाग्रामवर कायम सक्रीय असते. ती नेहमी विविध गोष्टींबद्दल पोस्ट करताना दिसते. नुकतंच प्रार्थनाने एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात तिने वजन कमी करण्याबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “मला तुझा खूप…”, सुव्रत जोशीला तृतीयपंथीयांच्या भूमिकेत पाहून स्वानंदी टिकेकरची पोस्ट; म्हणाली “‘ताली’मध्ये…”

“जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला व्यायाम करण्याची किंवा डाएट करण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त एखाद्या चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडा”, अशा आशयाची पोस्ट प्रार्थनाने शेअर केली आहे. त्याबरोबरच तिने हसण्याचे काही इमोजीही या पोस्टला कॅप्शन म्हणून लिहिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
prarthana behere
प्रार्थना बेहेरे

आणखी वाचा : “मी कुणाच्या नजरेत नजर…”, प्रिया बेर्डेंचा लावणी कार्यक्रमावर संताप, म्हणाल्या “स्कार्फ गुंडाळून…”

दरम्यान प्रार्थना ही एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच तिने झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये नेहा कामत ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला आणि मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.