मराठीमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये एक अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. मराठी नाटक, मालिकांमधून ऋतुजाने प्रेक्षकांना आपलसं केलं. उत्तम अभिनय करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही फार सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संपर्कात राहणं तिला आवडतं. आताही तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती लग्न पत्रिका तयार करताना दिसत आहे.

आणखी वाचा – Video : “गुरुजींनी मांडले आहेत समोर चार पाठ…” राणादाने घेतलेला उखाणा ऐकून पाठकबाई लाजल्या अन्…

काही दिवसांपूर्वीच ऋतुजाच्या बहिणीचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. लवकरच अनुजा बागवे विवाहबंधनात अडकणार आहे. बहिणीच्या लग्नाची ऋतुजा जोरदार तयारी करत आहे. बहिणीची लग्नपत्रिका ती स्वतः तयार करत आहे.

पाहा व्हिडीओ

ऋतुजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अनुजाची लग्नपत्रिका दिसत आहे. ही लग्नपत्रिका फारच सुंदर आहे. यावर नवरा-नवरी दिसत आहेत. तर ऋतुजा या पत्रिकेच्या सजावटीचं काम करत आहे. तिने व्हिडीओला खास कॅप्शनही दिलं आहे.

आणखी वाचा – ‘पावनखिंड’च्या यशानंतर अजय पुरकर साकारणार तानाजी मालुसरेंची भूमिका; मराठीतील ऐतिहासिक चित्रपट ‘सुभेदार’ची चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋतुजा म्हणाली, “प्रेमाने ही लग्नपत्रिका बनवत आहे. नवराई माझी लाडाची. शांतानू तू खूप लाडाचा.” ऋतुजाने बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याचंही नाव या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. ही लग्नपत्रिका पाहून काही कलाकार मंडळींनीही ऋतुजाच्या या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.