मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. तिने आतापर्यंत तिच्या अभिनय कौशल्याने सर्वांचीच मन जिंकून घेतली आहेत. तिने साकारलेली प्रत्येक भूमिका ही वैविध्यपूर्ण असते. विशेष म्हणजे ती तिच्या प्रत्येक कामात काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करते. सायली संजीव ही ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना वडिलांच्या समान मानते. नुकतंच तिने ती अशोक सराफ यांना काय नावाने हाक देते? याचा खुलासा केला आहे.

सायली संजीवने काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सुरेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने मालिका पदार्पण, वडिलांची तब्येत, शूटींगच्या वेळा याबद्दल भाष्य केले. त्याबरोबर तिने तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींचाही उल्लेख केला. यात तिने अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचे नाव घेत मी त्यांची मानलेली मुलगी आहे, असे सांगितले.
आणखी वाचा : अशोक सराफ यांच्या एका सल्ल्याने बदललं सायली संजीवचे आयुष्य, म्हणाले…

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

सायली संजीव काय म्हणाली?

“माझ्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत मी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचं नाव घेतलं नाही तर काही पूर्णत्वच येणार नाही. मी त्यांची मानलेली मुलगी आहे. ते ‘काहे दिया परदेस’ ही मालिका आवर्जुन पाहायचे. तेव्हापासून त्यांनी त्यांच्या मनात असं ठरवलं होतं की, आम्हाला मुलगी असती तर ती अशीच असती. त्यामुळे मी त्यांची मानलेली मुलगी आहे. त्या दोघांकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळतात.

माझे सर्वात उत्तम समीक्षक किंवा टीकाकार हे अशोक पप्पा आहेत. कारण ते माझं प्रत्येक काम, मुलाखत किंवा काहीही असेल ते पाहून ते मला टीप्स देतात. तू हे चुकीचं बोललीस, हे तू बोलायला नको होतं, असं ते मला अनेकदा सांगतात. माझे वडील माझ्या कामाकडे जितकं लक्ष देत नव्हते, तितकं अशोक पप्पा देतात. ते खूप बारकाईने लक्ष देतात. माझ्या कामात इकडंच तिकडे झालं, वागण्यात चुकलं असेल, तरीही ते मला फोन करुन सांगतात. हे असं करु नकोस.

लोकांच्या नजरेत आपली प्रतिमा बदलते, असं ते कायम मला सांगत असतात. हे करु नकोस, हे कर, कामातही ते मला मदत करतात. बाजूला कोणी बसलं असेल तरीही कसं बोललं पाहिजे, या सर्व गोष्टींची शिकवण ही मला अशोक पप्पांनी दिली. आम्ही ‘काहे दिया परदेस’ या मालिकेवेळी भेटलो नव्हतो. पण त्यानंतर एका म्युझिक लाँचदरम्यान आमची भेट झाली. त्यांना माझा फोन नंबरही पाठ आहे, मी काय शिकले आहे, काय शिकतेय याची देखील त्यांना माहिती आहे.

मी अशोक सराफ यांचं काम बघत मोठी झाली आहे. त्यांनी मी कधी प्रत्यक्षात भेटेन असा विचारही केला नव्हता. त्यांना मी पप्पा म्हणेन, असंही कधी विचार केला नव्हता. एकदा त्यांनी मला तू मला काय म्हणशील, असं विचारलं होतं. त्यावेळी त्यांना मी विचारलेलं काय म्हणू? तर त्यांनी पप्पा म्हणं असं सांगितलं होतं. कारण तू बाबांना बाबा म्हणतेस, तर मग मला पप्पा म्हणं. हे खरंच भाग्य आहे. त्यांची भेट होणं, त्यांनी मला मुलगी मानणं हे खरंच खूप भाग्याचं आहे”, असा खुलासा सायली संजीवने केला.

आणखी वाचा : “कॉलेजपासून…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने स्नेहलबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन 

दरम्यान सायली संजीवने ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तिने ‘बस्ता’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘दाह’, ‘झिम्मा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. ती सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते.