Marathi Actress Shweta Ambikar New Home : यंदाच्या वर्षी मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी नव्या घरात गृहप्रवेश केल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबई-ठाण्यात आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हेच स्वप्न उराशी बाळगून लोक दिवसरात्र मेहनत करत असतात. मराठी मालिकाविश्वातील अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच सगळ्या चाहत्यांसह नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे.

‘अशोक मा. मा.’ या मालिकेत काम करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीने गेल्यावर्षी ठाण्यात आपलं हक्काचं घर खरेदी केलं. नव्या घराला एक वर्ष पूर्ण होताच अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे. तसेच व्हिडीओमधून तिने संपूर्ण घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे श्वेता अंबिकर. आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केलेलं आहे.

श्वेताने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. अभिनेत्री सांगते, “आज हा व्हिडीओ बनवण्यामागे खास कारण आहे ते म्हणजे, मी माझं स्वत:चं घर घेतलं आहे. माझं हे नवीन घर ठाण्यात आहे. आज माझ्या घराला १ वर्ष पूर्ण झालं यानिमित्ताने ही आनंदाची बातमी तुम्हा सर्वांना सांगतेय. गेल्यावर्षी १४ जुलैला हे घर मी घेतलं होतं.”

श्वेताने नव्या घराचा व्हिडीओ शेअर करत त्याला ‘माझं नवीन घर’ असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्रीने घराच्या प्रवेशद्वाराजवळ मनी प्लांट ठेवलं आहे. तर दरवाजाच्या बाजूच्या भिंतीवर स्वामी समर्थांचे गुरुमंत्र लिहिलेला फलक लावला आहे. यानंतर अभिनेत्रीने घरातील प्रशस्त हॉल, किचन, देवघराची झलक या व्हिडीओमध्ये चाहत्यांना दाखवली आहे. अभिनेत्रीने हॉलमध्ये अनेक शोभेची झाडं ठेवली आहेत. याशिवाय तिच्या घरातील आरसा सर्वांचं लक्ष वेधून घेतो…असा मोठा आरसा घरात असावा असं श्वेताचं आधीपासूनच स्वप्न होतं असं तिने या व्हिडीओमध्ये सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, श्वेता अंबिकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर आजवर तिने ‘अशोक मा.मा.’, ‘रमा माधव’, ‘मुलगी झाली हो’, ‘बाजी’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.