मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहा धडवईने ही एका वेगळ्याच कारणाने चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. स्नेहा धडवई ही ‘बोक्या सातबंडे’ व्यावसायिक नाटकात झळकली. नुकतंच तिने तिच्या बहिणीसाठी उपचाराबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

स्नेहा धडवईने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटो शेअर केला आहे. यात तिने तिच्या मामेबहिणीच्या हृदय प्रत्यारोपणाबद्दल सांगितले आहे. त्यात तिने आर्थिक मदत हवी असल्याचे आवाहन केले आहे.
आणखी वाचा : “१० वर्षांपूर्वी घराची नोंदणी केली, पण…”, शशांक केतकरची मोठी फसवणूक; म्हणाला “बिल्डरला…”

स्नेहा धडवईने पोस्ट

“१३ वर्षांची श्रावणी येवले. ती केवळ 3 वर्षांची होती तेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने तिचे वडील गेले. अन मागच्या बऱ्याच काळापासून स्वतः श्रावणी देखील हृदयविकाराच्या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. सध्या तिला पुण्याच्या डी. वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये ऍडमिट केलेलं असून तिच्यावर Heart transplant म्हणजे हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी तब्बल 15 ते 20 लाख रुपयांचा खर्च सांगितलेला आहे. श्रावणीच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची असून तिची आई एकटीने चार जणांचं कुटुंब सांभाळतेय. त्यांच्यासाठी इतकी मोठी रक्कम उभं करणं शक्य नाहीये. त्यामुळं श्रावणीला आपल्या सर्वांच्या आर्थिक मदतीची प्रचंड गरज आहे.

याआधी श्रावणीवर Heart Valve Replacement ची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण त्यानंतर ही तिला हार्ट फेलियरचा त्रास सहन करावा लागतोय. सध्या तिच्या हृदयाचा काही भाग निर्जीव झालाय. शरीरात पाणी वाढतय आणि त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी तिच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया होणं गरजेचंय. श्रावणीसाठी आता मी तिची मामेबहीण स्नेहा धडवई Crowd Funding मधून आर्थिक मदत जमवण्याचा आटोकाट प्रयत्न करतेय. श्रावणीला आता तुमच्याही आर्थिक मदतीची गरजय. अगदी 1 रुपयापासून 10000 रुपयांपर्यंत तुम्हाला शक्य असेल तेवढी आर्थिक मदत खाली दिलेल्या UPI नंबर्सवर किंवा बँक अकाऊंटवर पाठवू शकता. जेवढ्या लवकर आपण पैसे गोळा करू तेवढ्या लवकर श्रावणीचं ऑपरेशन सुरू होईल. माणूस म्हणून पुढाकार घेऊयात”, असे आवाहन अभिनेत्री स्नेहा धडवईने म्हटले आहे.

आणखी वाचा : “अम्मा तू…”, शुभांगी गोखलेंच्या नव्या मालिकेचा पहिला भाग पाहिल्यानंतर लेकीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान स्नेहा धडवईने केलेली ती पोस्ट अभिनेता नितीश चव्हाणनेही शेअर केली आहे. स्नेहाची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. ती ‘बोक्या सातबंडे’ या नाटकात झळकत होती. त्याबरोबरच स्नेहाने ‘घोडा’ या चित्रपटाचे सहदिग्दर्शिका म्हणूनही काम केले आहे.