छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्नेहा वाघला ओळखले जाते. ती बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यामुळे ती चर्चेत आली होती. स्नेहा वाघ ही कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. त्याबरोबर ती सोशल मीडियावरीही सक्रीय असते. नुकतंच स्नेहा वाघने तिच्या पहिल्या मराठी मालिकेबद्दलची आठवण सांगितली आहे.

स्नेहा वाघने नुकतंच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने तिच्या पहिल्या मालिकेबद्दल सांगितले आहे. तिने ईटीव्ही मराठी वाहिनीवरील काटा रुते कुणाला या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. तिने या मालिकेच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

स्नेहा वाघची इन्स्टाग्राम पोस्ट

“जर टीव्हीशिवाय एखादा दिवस असेल तर मला माहिती नाही की मी आता कुठे असते. एक अभिनेत्री म्हणून मी माध्यमात होणारे बदल आणि त्यात होणारी वाढ या गोष्टी पाहिल्या आहेत. पण यातील एकच गोष्ट कायम असते आणि ती म्हणजे कनेक्टिव्हिटी!

आम्हा कलाकारांमधील असलेले बंध आणि अर्थातच तुम्ही आमच्यावर केलेले प्रेम हे फार महत्त्वाचे आहे. जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त जेव्हा मी या सुंदर प्रवासाकडे मागे वळून पाहते, तेव्हा मी प्रचंड भावूक होते. माझे हृदय प्रेमाने भरलेले असते. या प्रवासात माझी साथ देणाऱ्या तुमच्या प्रत्येकाचे आभार”, असे स्नेहा वाघने यात म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sneha G Wagh (@snehawagh)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान स्नेहा वाघने १३ वर्षांपूर्वी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तिने झी मराठीवरील ‘अधुरी एक कहानी’ या मालिकेत अर्पिता हे पात्र साकारलं होतं. तिने ईटीव्ही मराठी या वाहिनीवरील ‘काटा रुते कुणाला’ या मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होतीस. त्यानंतर तिने ‘ज्योती’, ‘ढोलकीच्या तालावर’, ‘चंद्रशेखर’, ‘मेरे साई’ यासारख्या अनेक मालिकेत काम केले होते. त्यानंतर ती ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातही सहभागी झाली होती.