मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. ती कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सध्या सोनाली ही ‘महाराष्ट्र ऑन माय लिप्स’ या एका कार्यक्रमात झळकताना दिसत आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळ आणि त्यांची वैशिष्ट दाखवली जात आहे. मात्र हा कार्यक्रम हिंदीत असल्याने एका नेटकऱ्याने तिला ट्रोल केले आहे. त्यावर सोनालीही सडेतोड उत्तर दिले.

सोनाली कुलकर्णीच्या ‘महाराष्ट्र ऑन माय लिप्स’ या कार्यक्रमाचा पहिला भाग नुकताच प्रदर्शित झाला. याचा एक युट्यूब व्हिडीओ तिने तिच्या ट्वीटरवर शेअर केला आहे. यात ती कोल्हापुरातील काही खास वैशिष्ट्य दाखवताना दिसत आहे. “कोल्हापूरात आम्ही आमचा संस्मरणीय प्रवास सुरू करतो. खऱ्या अर्थाने आई अंबाबाईची कृपा लाभलेले हे शहर संस्कृती,परंपरा,कलेचे माहेरघर आहे. लवंगी मिरचीच्या मसाल्यापासून ते गुळाचा गोडवा,योद्ध्यांच्या धाडसापासून ते कारागिरांच्या कौशल्यापर्यंत हे शहर सर्व पुरवते. आमच्या प्रवासात सामील व्हा”, असे तिने या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

Uddhav Thackeray, Mahayuti, campaign,
उद्धव ठाकरे यांना आयतेच कोलीत
Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’

सोनाली कुलकर्णीच्या या व्हिडीओला एका नेटकऱ्याने रिट्वीट केले आहे. त्यात त्याने ‘हिंदी का…?’ असा प्रश्न विचारला आहे. त्यावर सोनालीने “कारण हा कार्यक्रम हिंदी आणि English news channels साठी आहे”, असे म्हटले आहे.

सोनालीच्या या उत्तरावर पुन्हा त्या नेटकऱ्याने तिला एक प्रश्न विचाराला आहे. “दुःखद आहे आम्ही मराठी जपण्यासाठी काय काय उपद्रव करतो ताई आणि आपण.. हिंदी आणि इंग्रजी वाल्यांनी कधी मराठी भाषेमध्ये काही केले आहे का आज पर्यंत ??” असे तो नेटकरी म्हणाला आहे. त्याच्या या प्रश्नावर सोनालीने कपळावर हात मारल्याचा इमोजी शेअर केला आहे. त्याबरोबर त्याला सडेतोड भाषेत उत्तरही दिलं आहे.

“दुःखद हे आहे… की, तुम्हाला हे कळत नाहीये की महाराष्ट्राला देशभर आणि जगभर पोहचविण्यासाठी, आपली कला, संस्कृति, खाद्य-संस्कृति, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र टुरिझमने हा जो उपक्रम राबवलाय तो तुम्हाला कौतुकास्पद, महाराष्ट्राच्या हिताचं नाही वाटत आहे”, असे सोनालीने यावेळी म्हटले.

त्यावर त्या नेटकऱ्याने पुन्हा एकदा कमेंट केली आहे. “हो नक्कीच चांगला उपक्रम आहे पण हे सर्व त्यांना त्यांच्या भाषेतून समजणार. दक्षिणेत अस होत नाही ताई ते आपल्या भाषेवर ठाम असतात आणि आपल्या भाषेतून जगाला समजवण्याचा प्रयत्न करतात. यातून आपली कला, संस्कृती,पर्यटन सर्व इतर देशात राज्यात नक्की पोहोचेल पण आपल्या भाषेवर उलट परिणाम होईल”, असे म्हटले आहे.

“मत मांडली तर वाद अस वाटेल ताई प्रत्येकाची मत वेगळे असू शकतात माझी मी वेगळ्या चष्म्यातून बघतो तुम्ही वेगळ्या.. आपले मराठी चित्रपट आम्ही कुटुंबासहित बघतो आणि बघणार शेवटी तुमच्या कलेचा चाहते आहे आम्ही, असेही तो यावेळी म्हणाला.

दरम्यान या नेटकऱ्याने केलेल्या कमेंटवर सोनालीने कोणत्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. मात्र सोनाली कुलकर्णी करत असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि एका न्यूज चॅनलच्या विद्यमानाने करण्यात येत आहे. महाराष्ट्र ऑन माय लिप्स असे याचे नाव आहे. नुकताचा या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे.