स्टार प्रवाहच्या ‘वैजू नंबर वन’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली वैजू म्हणजेच अभिनेत्री सोनाली पाटील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी नेहमी सोनाली रील्स आणि फोटो शेअर करत असते. तसेच ती सोशल मीडियावरील व्हायरल ट्रेंडही फॉलो करताना दिसते. नुकताच तिनं तमन्ना भाटियाच्या ट्रेंडिंग ‘कावाला’ या गाण्यावरची रील पोस्ट केली आहे; जी सध्या चांगलाची चर्चेत आली आहे.

रीलमध्ये सोनाली ‘कावाला’ या गाण्याची हूक स्टेप करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ही रील पोस्ट करीत तिनं लिहिलं आहे, “आधीच रीलमध्ये डान्स करून जीव ‘कावनुया’. त्यात अजून पोरिगी नी पासिंग दिलं बेश्टच नाही का?” याबरोबर सोनालीनं एक म्हणही लिहिली आहे, “नाचता येईना अंगण वाकडे”

हेही वाचा – ‘मुन्ना भाई ३’ चित्रपटासाठी भेटले संजय दत्त व अर्शद वारसी? जाणून घ्या नेमकं कारण

हेही वाचा – काजोलची छोट्या पडद्यावर एंट्री; ‘या’ लोकप्रिय मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

पण अभिनेत्रीचा हा डान्स पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, “तमन्ना भाटियासारखा डान्स करता नाही आला. अजून प्रयत्न करीत राहा.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “अजय देवगण व सनी देओल स्टाईल डान्स वाटला.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहिल, “अरेरे वाट लावली तुम्ही तमन्नाची; डान्स येत नाही, तर कशाला करायचा?” तर चौथ्यानं तिच्या शरीरयष्टीवर बोलत लिहिलं, “किती जाड झाली आहेस, बापरे!”

हेही वाचा – ‘जस्सी जैसी कोई नहीं’ फेम अभिनेत्री कास्टिंग काऊचची झाली होती शिकार; खुलासा करत म्हणाली, “मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘वैजू नंबर वन’ मालिकेनंतर ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये तिनं काम केलं. तसेच ती बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातही दिसली होती. त्यानंतर तिनं हिंदी मालिकाविश्वातही पाऊल ठेवलं. ‘वागले की दुनिया’ या मालिकेत तिनं काम केलं होतं.