छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीला ओळखले जाते. ती एक उत्तम अभिनेत्री आणि एक संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते. स्पृहाने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. यामुळे घराघरात तिला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. नुकतंच स्पृहाने तिचा १३ वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

स्पृहा जोशी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच स्पृहाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या कॉलेजच्या काळातील आठवणी ताज्या केल्या आहेत. तसेच तिने तिचा २०१० मधील फोटोही पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : Video : “नागराज मंजुळेंचे आकाशवर जास्त प्रेम”; सल्या, बाळ्या, प्रिन्स आणि जब्याने व्यक्त केली नाराजी, म्हणाले “त्यांनी आम्हाला…”

स्पृहाने शेअर केलेल्या या फोटोत ती साडी नेसून बसल्याचे दिसत आहे. त्यात ती फारच छान, गोड स्मितहास्य करत आहे. तिने शेअर केलेला हा फोटो २०१० मधील आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे. “कॉलेजमधील दिवस, २०१०, या आठवणीसाठी गुगलचे धन्यवाद”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

आणखी वाचा : अभिनेत्री स्पृहा जोशीने सांगितला लग्नापूर्वीचा किस्सा, म्हणाली “आम्हाला जबरदस्ती एका…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पृहाच्या या फोटोवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहे. ‘किती गोंडस’, अशी कमेंट अभिनेत्री पोर्णिमा डे यांनी केली आहे . तर अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने हार्ट इमोजी शेअर केला आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होताना पाहायला मिळत आहे.