मराठमोळी अभिनेत्री सुरुची अडारकर नुकतीच विवाहबंधनात अडकली. सुरुचीने अभिनेता पियुष रानडेबरोबर सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली. सुरुची आणि पियुष यांच्या लग्नानंतर अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता यावर तिची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुरुची अडारकरने बुधवारी (६ डिसेंबर) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यात तिने अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्नबंधनात अडकल्याचे जाहीर केले. याचे काही फोटोही तिने पोस्ट केले. सुरुचीने लग्नावेळी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तर पियुषनेही तिला मॅचिंग कुर्ता लेहंगा परिधान केला होता.
आणखी वाचा : ‘आई आली आणि तिने सांगितलं बाबा गेले…”; प्रसिद्ध मराठी नृत्यदिग्दर्शिकेची वडिलांच्या आठवणीत पोस्ट, म्हणाली “माणूस दारुमुळे…”

या फोटोत सुरुची ही नववधूच्या रुपात पाहायला मिळत आहे. तर अभिनेता पियुष रानडे हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. सुरुचीने हा फोटो पोस्ट करताना “आनंदाचा दिवस” असे कॅप्शन दिले आहे. त्याबरोबरच तिने PSILoveYou असा हॅशटॅगही शेअर केला आहे.

सुरुचीने हा फोटो पोस्ट केल्यानंतर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी सुरुची आणि पियुषचे अभिनंदन केले आहे. त्यावर सुरुचीने त्यांचे आभार मानणारी पोस्ट शेअर केली आहे.

“माझे कुटुंब, मित्र परिवार यांनी भरभरुन दिलेल्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी त्यांचे खूप खूप आभार. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. त्याबरोबर प्रसारमाध्यमांनी आमच्यावर केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावासाठी त्यांचेही धन्यवाद. आम्ही सदैव कृतज्ञ राहू”, असे सुरुचीने म्हटले आहे.

Suruchi Adarkar comment
सुरुची अडारकरची पहिली प्रतिक्रिया

आणखी वाचा : मराठमोळा अभिनेता पियुष रानडे तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात, अभिनेत्री सुरुची अडारकरबरोबर घेतल्या सप्तपदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सुरुची अडारकरचे हे पहिलं लग्न आहे. तर पियुष रानडेचे हे तिसरे लग्न आहे. याआधी तो अभिनेत्री शाल्मली टोळ्ये आणि मयुरी वाघ यांच्याशी लग्नबंधनात अडकला होता. मात्र, लग्नाच्या काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.