‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखले जाते. चेहऱ्यावर सुंदर हास्य आणि सुंदर अभिनय यामुळे तेजश्री कायमच चर्चेत असते. तेजश्री प्रधानने ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत जान्हवी ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या या मालिकेतील भूमिकेचे आजही कौतुक केले जाते. नुकतंच तेजश्रीने एक पोस्ट शेअर केली. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

तेजश्री प्रधान ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच तेजश्रीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहेत.
आणखी वाचा : “एकनाथ शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण…” मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “चार हात, दोन फोन, एक नाथ…”

तेजश्रीने शेअर केलेल्या या फोटोत ती कोट घालून एका ठिकाणी बसल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोला कॅप्शन देताना ती म्हणाली, “तुम्ही ज्या मार्गाने जगायला शिकलात, त्याच मार्गाने तुम्ही जगायला हवं, हे गरजेचं नाही. बरे व्हा आणि पुढे जा”, असे तिने यात म्हटले आहे.

आणखी वाचा : “आयुष्यातील सर्वात कठीण काळ…” तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आपल्या मनमोहक सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखले जाते. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून तेजश्री प्रधान प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तेजश्री प्रधान हिने ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिकाही चांगलीच गाजली होती.