छोट्या पडद्यावरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. मात्र आता या मालिकेला अभिनेत्री प्रिया मराठेने रामराम केला आहे. प्रिया मराठे ही या मालिकेत मोनिका हे नकारात्मक पात्र साकारत होती. तिने ही मालिका सोडण्याचं कारणही सांगितलं आहे. त्यानंतर आता मोनिका हे पात्र कोण साकारणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं. अखेर हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे.
प्रिया मराठेने नुकंतच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. “अचानक तब्येतीची आलेल्या अडचणीमुळे तिने ही मालिका सोडल्याचे जाहीर केले. जो वेळ मी त्यांना देत होते, तो वेळ कुठेतरी अपुरा पडत होता. बाकीच्या कलाकारांच्या वेळा, क्रिएटिव्ह टीम, प्रोडक्शन टीम, ती भूमिका इतकी डिमांडिंग होती. या सगळ्याच कारणांमुळे मला मालिकेतून निरोप घ्यावा लागतो”, असे प्रिया मराठेने सांगितले आहे.
आणखी वाचा : Video : प्रिया मराठेचा ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेला रामराम, कारण सांगत म्हणाली “ही भूमिका…”
त्यानंतर आता या मालिकेच्या चाहत्यांना मोनिका हे पात्र कोण साकारणार असा प्रश्न पडला होता. नुकतंच मोनिका हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. प्रिया मराठेच्या जागी आता बिग बॉस फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी झळकणार आहे. तिने नुकतंच एक व्हिडीओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. तेजस्विनीने अवनीबरोबर एक छान रिलदेखील शेअर केला आहे.
“खूप आनंद होतोय सांगताना की मी स्टार प्रवाह परिवारची सदस्य झाले आहे. तर पाहायला विसरू नका “तुझेच मी गीत गात आहे”. फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर रोज रात्री ९ वाजता. ह्या छोट्या चिमुकलीसोबतचा हा गमतीदार वीडियो. धन्यवाद स्टार प्रवाह”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.
या व्हिडीओवर अभिनेता अभिजीत खांडकेकरने कमेंट केली आहे. “तुझे आमच्या कुटुंबात स्वागत आहे”, असे त्याने म्हटले आहे. त्यावर तेजस्विनीने “धन्यवाद” असे म्हटले आहे.
आणखी वाचा : “…तर मी दोन मुलांची आई असते”, केतकी चितळेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “वयाच्या चौथ्या वर्षी…”
दरम्यान तेजस्विनी लोणारीची ही पहिलीच मराठी मालिका आहे. या मालिकेतून ती मालिकाविश्वात पदार्पण करत आहे. त्यापूर्वी ती हिंदी मालिकेमध्ये झळकली होती. तेजस्विनी लवकरच ‘कलावती’ या चित्रपटादेखील दिसणार आहे. त्याबरोबरच मकरंद अनासपुरे यांच्याबरोबरही ती एका चित्रपटात झळकणार आहे.