अभिनेत्री उर्मिला निंबाळकर अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी ती चाहत्यांच्या कायमच संपर्कात असते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या युट्यूब चॅनलवर लाईफस्टाईल, मेकअप, ट्रव्हल यांसारख्या विविध विषयांवर व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच तिने तिच्या स्किनकेअरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
ऑक्टोबर हिट सुरु झाल्याने सर्वच ठिकाणच्या तापमानात वाढ झाली आहे. त्यात उर्मिला निंबाळकर ही सध्या गोव्यात आहे. गोव्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी विविध सौंदर्य प्रसाधन वापरण्याचा सल्ला अनेकजण देत असतात. नुकतंच उर्मिलानेही तिच्या चाहत्यांना तिच्या सुंदर आणि नितळ त्वचेचे रहस्य सांगितले आहे.
आणखी वाचा : “स्वच्छ पाणी, तंत्रज्ञानाचा योग्य वापर अन्…”, आदेश बांदेकर पर्यावरणपूरक पद्धतीने करतात बाप्पाचे विसर्जन, म्हणाले “ती माती…”
या व्हिडीओत उर्मिला ही तिच्या बॅगेत काय काय आहे? याबद्दल सांगत आहे. “माझ्या बॅगेत विविध सनस्क्रीन आहेत. त्याबरोबरच माझ्या बॅगेत संतूर या ब्रँडचा साबणही असतो”, असे तिने सांगितले.
तिच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. “या साबणाने आमची त्वचा कोरडी होते.” तर काहींनी “हा साबण वापरल्यावर आमची त्वचा ओढल्यासारखी वाटते”, असे म्हटले आहे. “ताई माझी त्वचा संतूर साबणाने खूप रफ होते. खूप कोरडी होऊन रॅश येतात. खरच. मी फक्त निळा पिअर्स साबण वापरते”, अशी कमेंट तिच्या एका चाहतीने केली आहे.
त्यावर उर्मिलाने उत्तर दिले आहे. “जसे सगळे स्किनकेअर आणि मेकअप प्रोडक्ट सर्वांनाच सहन होतील, तसंच याचंही असेल. काळजी करु नका. त्यामुळे कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी खबरदारी घ्या. तुमच्या त्वचेला जे योग्य असेल तेच उत्पादन वापरा”, अशी कमेंट उर्मिलाने केली आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान उर्मिलाने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप निर्माण केली. ‘दुहेरी’, ‘बन मस्का’ या मराठी मालिकांमध्ये ती झळकली. तर ‘दिया और बाती हम’, ‘एक तारा’ यांसारख्या हिंदी मालिकेतही ती झळकली.