आपल्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखाने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. मराठी मालिका आणि चित्रपटांमधून विशाखाने आपला ठसा उमटवला. विशाखा सुभेदारने नुकतंच तिच्या मुलाच्या नावाबद्दलचा खुलासा केला आहे.

विशाखा सुभेदारने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या व्यावसायिक करिअरबरोबरच खासगी आयुष्याबद्दलही अनेक खुलासे केले. यावेळी तिने तिला आलेल्या अडचणींबद्दलही भाष्य केले. यादरम्यान तिला तिच्या मुलाचे नाव अभिनय का ठेवले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने मनमोकळेपणाने उत्तर दिले.
आणखी वाचा : “…म्हणून मी ट्रेनमध्ये ड्रेस मटेरिअल विकायचे”, विशाखा सुभेदार यांचा खुलासा, म्हणाल्या “माझा नवरा…”

pushkar shrotri reacts on chinmay mandlekar trolling incident
“मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून…”, चिन्मय मांडलेकर ट्रोलिंग प्रकरणावर पुष्कर श्रोत्रीचं स्पष्ट मत; म्हणाला, “इतिहास चाचपडून बघा”
Ulta-Chashma
उलटा चष्मा: नवी ‘भूमिका’
What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”

“मी सिनेसृष्टीत काम करते, म्हणून मी माझ्या मुलाचं नाव अभिनय ठेवलं असं नाही. मी जेव्हा नालंदा नृत्य कला महाविद्यालयात शिकत होते, तेव्हाच माझं ठरलं होतं की जर मला मुलगा झाला तर मी त्याचं नाव अभिनय ठेवणार आणि जर मुलगी झाली तर तिचं नाव यामिनी ठेवणार.

कारण रंगमंचाची जी चौथी विंग असते त्याला यामिनी म्हणतात. त्यामुळे ते अभ्यासात आलं होतं. त्यामुळे मग यामिनी नाव छान आहे. तर अभिनय म्हणजे फक्त हावभाव नव्हे. अभि म्हणजे एखादी गोष्ट पुढे नेणे. त्यामुळेच आपल्या वंशाचा दिवा पुढे नेणारा मुलगा म्हणून अभिनय. मी खूप आधीपासून हे लॉजिक ठरवलं होतं. त्यामुळे माझ्या मुलांची नाव ही ठरलेली होती”, असे विशाखा सुभेदारने म्हटले.

आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य 

दरम्यान विशाखा सुभेदार ही सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत झळकत आहे. यात ती रागिनी महाजन हे नकारात्मक पात्र साकारत आहे. त्याबरोबरच ती ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकातही व्यस्त आहे. या नाटकाद्वारे तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.