दिग्दर्शक संजय जाधव हे मराठी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेलं नाव आहे. संजय यांनी एकापेक्षा एक उत्तम चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले. संजय जाधव यांचा ‘दुनियादारी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. संजय जाधव यांच्या लेकीने काही वर्षांपूर्वी गृहोद्योग सुरु केला होता. काही दिवसांपूर्वी याबद्दल संजय जाधव यांनी पोस्ट शेअर केली होती. आता एका प्रसिद्ध मराठमोळी लेखिका आणि अभिनेत्रीने या पदार्थांची चव चाखली आहे.

संजय जाधव यांच्या मुलीचे नाव ध्रिती जाधव असे आहे. ती एक उत्तम नृत्यांगणा असून तिला स्वयंपाकाचीही आवड आहे. काही वर्षांपूर्वी ध्रितीने सिम्बा किचन नावाचा गृहोद्योग सुरु केला होता. यात ती घरी विविध पदार्थ बनवून त्याची ऑनलाईन डिलीव्हरी करते. काही दिवसांपूर्वी सिम्बा किचनमध्ये पुन्हा ऑर्डर देता येतील, अशी पोस्ट संजय जाधव यांनी केली होती. आता त्यांच्या या हॉटेलमधून लेखिका मुग्धा गोडबोले यांनी काही पदार्थ ऑर्डर केले आहे.
आणखी वाचा : “खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”

मुग्धा गोडबोले यांनी नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी या पदार्थाचे काही फोटो शेअर केले आहे. त्याबरोबरच त्यांनी त्याला कॅप्शन देताना काय आवडलं तेही सांगितलं आहे.

“सिम्बा किचन, खरोखरच उत्कृष्ट पदार्थ आणि ते खाल्ल्यानंतर माझा चेहरा. मी हे पदार्थ खातानाचे फोटो माझ्याकडे नाहीत. कारण मला खूप भूक लागली होती. आगरी चिकन टॅकोस् खरंच फार सुंदर होते. मी आतापर्यंत खाल्लेल्या टॅकोस् मधील कदाचित सर्वोत्तम”, असे मुग्धाने म्हटले आहे.

आणखी वाचा : “इंग्रज कोकणस्थ ब्राह्मणांना आपली औलाद म्हणून सोडून गेले”, म्हणणाऱ्याला मराठी अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, “ही भाषा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान संजय जाधव यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती. यात त्यांनी सिम्बा किचन परत आले आहे, असे म्हटले होते. यावेळी त्यांच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या होत्या.