बालकलाकार मायरा वायकुळ म्हणजेच सर्वांची लाडकी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील परी तिच्या निरागसपणामुळे सर्वांनाच भुरळ घालत असते. मालिकेमध्ये तिने तिचं अभिनय कौशल्य आपल्याला दाखवलंच आहे, पण सोशल मीडियावरही तिचा चाहतावर्ग कमी नाही. मायराचे आई-वडीलही मायराचे गमतीशीर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तिच्याबद्दल अपडेट्स देत असतात. आता तिचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

मायरा नुकतीच तिच्या कुटुंबीयांबरोबर एका रोड ट्रीपला गेली होती. या वेळेस काढलेला हा व्हिडीओ आहे. त्यांच्या गाडीवर माकडांनी अतिक्रमण केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. पण माकड आपल्या गाडीच्या काचेसमोर आणि टपावर बसलेली असताना माहेराची रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी होती.

आणखी वाचा : “आता वेळ आलीए पूर्णविराम देण्याची…” सुव्रत जोशीच्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहते निराश

हेही वाचा : प्रार्थना बेहरेला बघताच परीला कोसळले रडू, जाणून घ्या नेमकं काय घडलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या मायरा सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. ती तिच्या कुटुंबियांबरोबर माऊंट अबूला फिरायला गेली आहे. त्यावेळेचा मायराचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. यामध्ये मायरा तिच्या कुटुंबासोबत गाडीमध्ये बसलेली आहे. तर त्यांच्या गाडीच्या समोरच्या दोन्ही आरशांवर एक एक माकड आणि गाडीच्या टपावर एक मोठं माकड बसलेलं दिसत आहेत. मायराला हे बघून फार मजा येत असल्याचं दिसत आहे. माकडांना पाहून ती खूप खुश झाली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. तिचे चाहतेही या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स करत आहेत.