काही दिवसांपूर्वी लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकुळ मोठी ताई झाली. तिची आई श्वेता वायकुळ यांनी १५ सप्टेंबरला एका गोंडस मुलाला जन्म दिला. ही आनंदाची बातमी मायराच्या सोशल मीडियावरून जाहीर करण्यात आली होती. तेव्हापासून चाहते मायराच्या चिमुकल्या भावाला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. नुकतंच मायराच्या छोट्या भावाचं घरी जल्लोषात स्वागत झालं; ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

“आमचा सुपरहिरो घरी आला”, असं कॅप्शन लिहित ‘मायरा कॉर्नर’ या युट्यूब चॅनेलवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये हॉस्पिटलपासून घरी मायराच्या भावाला कसं आणलं हे पाहायला मिळत आहे. मायराच्या चिमुकल्या भावासाठी खास फुग्यांनी सजवलेली गाडी पाहायला मिळत आहे. चिमुकल्या पाहुण्याचं घरी आगमन होणार असल्यामुळे मायराच्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाल्याचं दिसत आहे.

हेही वाचा – Video: अभिजीत सावंतने निक्की तांबोळीची केली जबरदस्त नक्कल, व्हिडीओ पाहून तुम्हाला होईल हसू अनावर

चिमुकल्या भावाला हॉस्पिटमधून घरी नेताना मायरा नाचत त्याच्यावर फुलं उधळताना दिसत आहे. मायराच्या घराबाहेर फुलांची रांगोळी काढली असून फुग्यांनी प्रवेशद्वारे सजवलेलं पाहायला मिळत आहे. मायरा स्वतः आपल्या छोट्याशा भावाला घरी घेऊन येताना दिसत आहे. औक्षण करून मायराच्या छोट्या भावाचं स्वागत केलं असून यावेळी त्याच्या चिमुकल्याचा पायाचे ठसे उमटवले आहेत. शेवटी केक कापून हे सेलिब्रेशन पूर्ण केलं आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18 : सलमान खानच्या बहुचर्चित ‘बिग बॉस’साठी सहा स्पर्धकांवर शिक्कामोर्तब, ‘हा’ मराठी चेहरा झळकणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा पूर्ण व्हिडीओ

दरम्यान, मायरा वायकुळच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘माझी तुझी रेशीमगाठ’नंतर हिंदी मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या मालिकेत ती झळकली होती. या हिंदी मालिकेत मायरा अभिनेत्री स्नेहा वाघबरोबर प्रमुख भूमिकेत दिसली. यानंतर मायराने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटात ती पाहायला मिळाली. या चित्रपटात ती मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत अशा तगड्या कलाकारांबरोबर झळकली.