scorecardresearch

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्रीने खरेदी केली नवी कार, व्हिडीओ शेअर करत म्हणाली “तुमची स्वप्न…”

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केली नवी कार, शेअर केला व्हिडीओ

sheetal kshirsaagar buy new car
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केली नवी कार. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शीतल क्षीरसागर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. शीतलने आजवर अनेक मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमुळे शितलला लोकप्रियता मिळवून दिली. शीतल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

शीतलने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. शीतलने हुंडाई कंपनीची गाडी खरेदी केली आहे. शीतलने खरेदी केलेल्या गाडीची किंमत सुमारे सात ते आठ लाखांच्या घरात आहे.

हेही वाचा>> “१०-२० वर्ष ब्रेक घे” नवीन चित्रपटाचं पोस्टर शेअर करताच अक्षय कुमार ट्रोल, नेटकरी म्हणाले “रिमेक…”

हेही वाचा>> राणादा-पाठकबाईंनी साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, फोटोमधील अक्षयाच्या साधेपणाने वेधलं लक्ष

“तुमची स्वप्नं नक्की पूर्ण होतात. आई वडिलांच्या आशिर्वादाने, कुटुंबाच्या प्रेमामुळे आणि सद्गुरू कृपेने माझ्या बकेट लिस्टमधलं एक स्वप्न पूर्ण झालं. गुडी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ही आनंदाची बातमी तुम्हांला सांगताना खूप आनंद होतोय. गुडी पाडव्याच्या मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. हे वर्ष आणि येणारं प्रत्येक वर्ष तुमच्या शुभ,मंगल इच्छा पूर्ण करणारं जावो. तुम्हांला सुख, समाधान ,सौख्य, ऐश्वर्य ,भरभराट, मनःशांती आणि आरोग्यपूर्ण दिर्घायुष्य लाभो हीच सद्गुरूं चरणी प्रार्थना…”, असं शीतलने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “कलश कुठे आहे?” अंकिता लोखंडेचा गुढीपाडव्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा संताप अनावर, म्हणाले “घरात कोणी…”

शीतलच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेट करत तिल्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या शीतल कलर्स वाहिनीवरील ‘रमा राघव’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 18:03 IST

संबंधित बातम्या