Mhada Lottery 2024 : मुंबईत आपलं हक्काचं घर असावं हे स्वप्न प्रत्येकाचं असतं. सामान्य लोकांप्रमाणे अनेक मराठी कलाकार सुद्धा अशी मोठी स्वप्न बघत या मायानगरीत आपलं नशीब आजमवण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षात अनेक मराठी कलाकारांनी नवीन घरं घेत आपली स्वप्नपूर्ती केली आहे. मात्र, आता नवीन घर घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत आणखी काही जणांची नावं जोडली गेली आहेत.

सध्या मुंबईत घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना आपलं हक्काचं घर देण्यासाठी म्हाडाची लॉटरी काढली जाते. अवघ्या काही घरांसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज केले जातात. यामध्ये कलाकारांचा देखील समावेश असतो. यंदा मुंबईतील विविध भागातील २ हजार ३० घरांसाठी म्हाडाने जाहीरात काढली होती. यामध्ये मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना विशिष्ट श्रेणीतून अर्ज भरता येतो. त्यामुळे यंदा देखील बहुसंख्य कलाकारांनी म्हाडाच्या लॉटरीत घर मिळण्यासाठी अर्ज ( Mhada Lottery 2024 ) केला होता. गोरेगावच्या २ घरांसाठी तब्बल २७ कलाकारांनी अर्ज केले होते. अखेर ही घरं कोणाच्या नशिबात होती जाणून घेऊयात…

हेही वाचा : सूरज चव्हाण झाला अभिनेता! Bigg Boss संपताच पहिल्या चित्रपटाची लॉटरी; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, पाहा ट्रेलर

म्हाडाची लॉटरी ( Mhada Lottery 2024 ) जाहीर झाली असून, गौतमी देशपांडेला गोरेगावमध्ये घर लागलं आहे. तर, विक्रोळी कन्नमवार नगरमधलं घर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेला मिळालं आहे. पवईमधली दोन घरं गौरव मोरे आणि शिव ठाकरे यांना मिळाली आहेत. पवईतील घर उच्च श्रेणीत मोडत असल्याने त्यांची किंमत १ कोटी ७८ लाख इतकी आहे.

Mhada Lottery new house gaurav more
अभिनेता गौरव मोरे ( Mhada Lottery )

हेही वाचा : बापाचं प्रेम! Bigg Boss नंतर अडीच महिन्यांनी घरी परतणार धनंजय पोवार; वडील करताहेत ‘अशी’ तयारी, समोर आला व्हिडी

पवईत हक्काचं मोठं घर घेणार हे गौरवचं स्वप्न होतं. यापूर्वीच त्याने अनेक मुलाखतींमध्ये याबद्दल खुलासा केला होता. अखेर त्याची स्वप्नपूर्ती म्हाडाच्या लॉटरीच्या निमित्ताने पूर्ण झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गौरवला सगळेजण पवई ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून देखील ओळखतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला. काही दिवसांपूर्वीच गौरवने या शोमधून निरोप घेतला. आता येत्या काळात अभिनेता नवनवीन चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.