मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी अभिनयसृष्टीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. एका चित्रपटात त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनीही सुप्रियांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली आहे.

दोन दशकांपूर्वी “हे आपलं असंच चालायचं” या चित्रपटात मिलिंद व सुप्रिया यांनी एकत्र काम केलं होतं. त्या चित्रपटावेळची आठवण सांगत मिलिंद गवळी लिहितात, “सुप्रिया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….
सुप्रिया वीस बावीस वर्षांपूर्वी आपण श्री वि.के. नाईक यांचा हा चित्रपट केला होता
“हे आपलं असंच चालायचं”, आपण बहीण भावाची भूमिका केली होती. त्या चित्रपटाच्या इतक्या सुंदर आठवणी अजूनही माझ्या मनामध्ये घर करून बसले आहेत, आपल्या त्या सेटवर एक प्रेमळ अवलिया होता, जो प्रत्येकाला पोट दुखेपर्यंत हसवायचा, तो म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका विजू मामा ( विजय चव्हाण ), खूप म्हणजे खूपच मजा आली होती तो चित्रपट करताना , पण
त्यानंतर आपल्याला एकत्र काम करायचा कधीच योग आला नाही, ही गोष्ट माझ्या मनामध्ये राहून गेलेली आहे. पण इतक्या वर्षानंतर सुद्धा आपलं नातं तितकच सुंदर आणि घट्ट आहे,
तो तुझा पहिला चित्रपट होता, त्यानंतर तू अभिनय क्षेत्रात मागे वळून पाहिलंसच नाहीस, तुझे कष्ट, तुझी मेहनत तुझी चिकाटी and immense Talent, तुझं यश, तुझी प्रगती बघून मला खूप अभिमान वाटतो,
आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला खूप खूप शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद, अशीच रहा, खूप खूप यशस्वी हो,
आतापर्यंत तुझ्या अभिनयाने आम्हाला खूप हसवलंस, तसंच नेहमी हसवत राहा, आणि तू ही हसत रहा आणि आनंदी राहा,” असं मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकत्र काम करून आता २२ वर्षे लोटली आहेत, त्यानंतर पुन्हा एकत्र काम करायची संधी मिळाली नाही, याबद्दल मिलिंद गवळींनी खंत व्यक्त केली. तसेच त्यांनी सुप्रिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.