‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता होऊन आता एक आठवडा झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. अभिनेता २२ एप्रिल रोजी बेपत्ता झाला होता, नंतर २४ एप्रिलला त्याच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या दिल्लीतील पालममधील एका एटीएममधून त्याने सात हजार रुपये काढले होते. त्याचे एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले होते, ज्यात गुरुचरण २२ एप्रिलला रात्री ९.१४ वाजता पालम परिसरात रस्ता ओलांडताना दिसला होता.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ५० वर्षीय गुरुचरण लवकरच लग्न करणार होता आणि तो आर्थिक अडचणीत होता. या संपूर्ण चर्चांबद्दल ‘इंडियन एक्सप्रेस’ने गुरुचरण सिंगच्या कुटुंबियांना विचारलं. त्याचे कुटुंबीय म्हणाले की त्यांना गुरुचरणच्या लग्नाबद्दल काहीच माहीत नाही. या सगळ्या बातम्या कुठून येत आहेत, हेही माहीत नाही. गुरुचरणच्या नातेवाइकानं दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्याचे वडील आता बोलण्याच्या स्थितीत नाहीत आणि त्यांना अजून याप्रकरणी कोणतीही अपडेट मिळाले नाही.

गुरुचरण सिंगचं शेवटचं लोकेशन सापडलं, बेपत्ता झाल्यावर तीन दिवस ‘इथं’ होता अभिनेता, एटीएममधून पैसे काढले अन्…

गुरुचरण सिंग आर्थिक संकटाचा सामना करतोय, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. गुरुचरणचं मानसिक आरोग्य ठिक आहे, तो अस्वस्थ नव्हता, असं तो बेपत्ता झाल्यावर त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं. रविवारी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने गुरुचरणच्या घरी भेट दिली होती. जेणेकरून तो बेपत्ता होण्यापूर्वी काय घडलं होतं, याबाबत कळू शकेल.

गुरुचरण सिंगने बेपत्ता होण्यापूर्वी पाठवलेला ‘हा’ मेसेज, प्रसिद्ध निर्मात्याने दिली माहिती; म्हणाले, “भक्ती त्याला आणायला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुचरण सिंग २२ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता दिल्लीहून मुंबईसाठी फ्लाइट पकडणार होते, मात्र तो विमानतळावर पोहोचलाच नाही. तो मुंबईला गेला नाही आणि तो घरीही परतला नाही. त्याचा फोनही बंद होता. त्यामुळे त्याच्या वडिलांनी २६ एप्रिलला पोलिसांत तक्रार दिली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.