एकेकाळी बॉलीवूड ते टीव्ही जगतात अभिनयाने आपला ठसा उमटवणारी दीपशिखा नागपाल यशस्वी अभिनेत्री आहे. ४६ वर्षांच्या दीपशिखाने दोन लग्नं केलीत आणि दोन्हीवेळा तिची लग्नं मोडली. तिला पहिल्या पतीपासून दोन अपत्ये आहेत. दोन अयशस्वी लग्न आणि आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेल्या दीपशिखाला आयुष्यात प्रेम आणि जोडीदार हवा आहे. तिनेच याबाबत भाष्य केलं आहे.

आयरा खानच्या सासूबाईंना पाहिलंत का? आमिर खानने केलं मराठमोळ्या विहीणबाईंचं कौतुक; म्हणाला, “प्रीतमजी…”

दीपशिखा म्हणाली, “जेव्हा एखादं नातं संपतं, त्याचा तुमच्यावर परिणाम होतो. पण त्याचा अर्थ असा नाही की मी आता प्रेमावर विश्वास ठेवत नाही. प्रेम ही सर्वात सुंदर भावना आणि अनुभव आहे. आयुष्य हा एक प्रवास आहे आणि माझ्या भूतकाळातील नातेसंबंधातील धड्यांमुळे मी भावनिकरित्या कुणावर अवलंबून नाही. मी कोणाला दोष देत नाही. मी माझ्या सर्व नातेसंबंधांचा आदर करते कारण मी त्यांच्याबरोबर कधीतरी आनंदी होते. त्यामुळे त्यांनीही आयुष्यात आनंदी राहावं, असं मला वाटतं.” याबद्दल ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिलंय.

घटस्फोटाच्या घोषणेनंतर सोफी टर्नरचं जाऊबाई प्रियांका चोप्राशी बिनसलं? एकमेकींना सोशल मीडियावर केलं अनफॉलो

भूतकाळातील चुकांमधून शिकत ती प्रेमात घाई न करण्याचा सल्ला लोकांना देते. “चुकीच्या कारणासाठी कधीही कोणाशीही संबंध ठेवू नका. पूर्वी मला वाटायचं स्वतःला पूर्ण करण्यासाठी मला जोडीदाराची गरज आहे आणि माझ्यासारखे अपूर्ण कोणीतरी सापडेल असा माझा समज होता. पण मला कोणीही पूर्ण करू शकत नाही याची मला जाणीव झाली आहे. माझे स्वतःवर प्रेम आहे आणि मी स्वतःला सर्वाधिक प्राधान्य देते. आधी वाटायचं मुलं झाल्यानंतर सगळं ठिक होईल, पण तसं होत नाही. काही गोष्टी सोडून दिल्यानंतरच सगळं नीट होऊ लागतं. मला मिळालेला सर्वात मोठा धडा हा आहे की मी आर्थिक किंवा भावनिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून नाही. मी नात्यात माझी ओळख गमावू शकत नाही,” असं दीपशिखा म्हणाली.

आदर्श जोडीदाराबद्दल दीपशिखा म्हणाली, “मी फालतू संबंधांवर वेळ आणि शक्ती वाया घालवण्यावर विश्वास ठेवत नाही. मला माझ्या जोडीदाराकडून काही अपेक्षा आहेत, ज्यात प्रामाणिकपणा, निष्ठा आणि भावनिक आधार यांचा समावेश आहे. खरा माणूस शोधणं आव्हानात्मक आहे, परंतु मला विश्वास आहे की मला योग्य व्यक्ती सापडेल. मी एकटी किंवा दुःखी नाही, पण मला असा जोडीदार आवडेल ज्याच्यासोबत मी सर्व काही मोकळेपणाने शेअर करू शकेन. मला प्रेमात पडणं आवडतं आणि मला विश्वास आहे की मी लवकरच प्रेमात पडेन. मी जास्त काळ सिंगल राहणार नाही, कोणीतरी खास माझ्या आयुष्याचा भाग असेल. मला अजून लग्नाबद्दल माहिती नाही, कारण ही एक मोठी जबाबदारी आहे.”

View this post on Instagram

A post shared by Dipshikkha Nagppal (@deepshikha.nagpal)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिपशिखाने १९९७ मध्ये जीत उपेंद्रशी लग्न केलं होतं. या लग्नापासून तिला २२ वर्षांची मुलगी विधिका आणि १८ वर्षांचा मुलगा विवान आहे. १० वर्षांनी तिचा घटस्फोट झाला. नंतर तिने २०१२ मध्ये कैशव अरोराशी लग्न केलं होतं. पण चार वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. दरम्यान, मुलांना तिच्या रिलेशनशिप किंवा लग्नामुळे कुठलीही अडचण नसल्याचं ती सांगते. मुलंच तिला जोडीदार शोधण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचं ती म्हणाली.