सासू-सुनेचं बॉण्डिंग हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यात दोघीही कलाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्री असल्यावर चर्चा तर होणारच! अशीच मराठी कलाविश्वातील सासू-सुनेची लोकप्रिय जोडी म्हणजेच मृणाल कुलकर्णी व शिवानी रांगोळे. विराजस-शिवानीने ३ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. त्याआधी अनेक वर्षे हे दोघेही एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे मालिकेत अक्षराचं भुवनेश्वरीशी जमत नसलं, तरी खऱ्या आयुष्यात मात्र अभिनेत्री शिवानी रांगोळेचं सासूबाई मृणाल कुलकर्णींशी फार सुंदर नातं आहे.

मृणाल कुलकर्णी शिवानीला सूनेपेक्षा जास्त स्वत:ची मुलगी मानतात. सुरुवातीपासून शिवानी आपल्या सासूबाईंना ‘ताई’ अशी हाक मारते. त्यामुळे या दोघींच्या सुंदर बॉण्डिंगची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरू असते. सध्या शिवानी ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षरा उर्फ मास्तरीण बाई हे पात्र साकारत आहे. लग्नानंतर ती या मालिकेच्या शूटिंगमध्ये पूर्णपणे व्यग्र आहे.

हेही वाचा : “अभिनंदन बायको!” मुग्धा वैशंपायनला पदव्युत्तर पदवी; प्रथमेश लघाटे आनंद व्यक्त करत म्हणाला, “तुझा खूप…”

‘झी मराठी’वर लवकरच दोन नव्या मालिका येणार आहेत. या नव्या मालिकांच्या प्रमोशननिमित्त नुकतंच मृणाल कुलकर्णी यांनी सुनेसह एकत्र शूटिंग केलं. याचे काही फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत. शिवानी सतत शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने आम्हाला तिचे लाड करायला मिळत नाहीत. अशी गोड खंत त्या नेहमीच व्यक्त करतात. परंतु, आज प्रेक्षकांच्या लाडक्या सोनपरीने खास पोस्ट शेअर करत सुनेला सल्ला दिला आहे.

हेही वाचा : “बेट्याहो, महात्मा फुलेंची इज्जत…”, ‘तो’ फोटो शेअर करत किरण मानेंचा संताप; मुख्यमंत्री शिंदेना म्हणाले, “कारस्थान करुन…”

“मास्तरीण बाई, काम झक्कास करताय!! पण खाणं पिणं, तब्येत पण सांभाळा, नाहीतर आम्हीच शिकवू चांगला धडा!” अशी पोस्ट शेअर करत मृणाल कुलकर्णींनी सुनेला काळजी घेण्यास सांगितलं आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “गोड सासू-सुना”, “मस्त बोलल्या सासूबाई”, “तुमच्या सूनबाई अतिशय सुंदर अभिनय करतात” अशा कमेंट्स युजर्सनी या पोस्टवर केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिवानी रांगोळे गेली वर्षभर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात तिने तब्बल ३ पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं होतं.