अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली. गेली अनेक वर्ष शिवानी आणि विराजस यांची मैत्री असल्याने विराजसच्या कुटुंबियांशीही शिवानीचे लग्नाआधीच खूप छान बॉण्डिंग तयार झाले. शिवानी ही मृणाल कुलकर्णी यांची अत्यंत लाडकी आहे. आज शिवानीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या लाडक्या सूनेसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील सासू-सूनेची लोकप्रिय जोडी आहे. अनेक कार्यक्रमांना त्या दोघी एकत्र हजेरी लावताना दिसतात. याबरोबरच सोशल मीडियावरून देखील त्या एकमेकींबद्दल त्यांना वाटणारं प्रेम अनेकदा व्यक्त करत असतात. तर आज शिवानीच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी एक पोस्ट लिहित त्यांच्या मनातली एक इच्छा व्यक्त केली आहे.

shivani rangole mother started new venture
मास्तरीण बाईंनी दिली आनंदाची बातमी! शिवानी रांगोळेच्या आईने सुरू केला ‘हा’ नवीन उपक्रम; म्हणाली, “लहानपणी मला…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
rahul solapurkar on chhatrapati shivaji maharaj
Rahul Solapurkar: छत्रपती शिवरायांबाबतच्या ‘त्या’ विधानावर राहुल सोलापूरकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “लाच हा शब्द…”
Kushal Badrike Post For Shreya Bugde
“तुला भेटल्यावर…”, श्रेया बुगडेच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणाला, “स्वर्गसुद्धा नरक वाटेल…”
Sandeep Narayan Sings Marathi Song Kanda Raja Pandhricha
कर्नाटकी शास्त्रीय गायक संदीप नारायण जेव्हा ‘कानडा राजा पंढरीचा’ गातात! जयपूर महोत्सवात ‘विठ्ठल विठ्ठल’चा गजर
Maghi ganesh chaturthi 2025 wishes messages quotes sms whatsapp facebook status in marathi
Maghi Ganesh Jayanti Wishes : माघी गणेश जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा खास शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
संदूक: आव्हानात्मक ‘लायर’
republic day 2025 26 January Charoli poem sologan quotes in Marathi
Happy Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा सुंदर मराठी चारोळ्या, WhatsApp, Facebook वर शेअर करा कविता अन् घोषवाक्ये

आणखी वाचा : “शिवानी आणि विराजस, तुम्ही दोघेही…,” मृणाल कुलकर्णींनी व्यक्त केला आनंद, जाणून घ्या खास कारण

त्यांनी सोशल मीडियावर शिवानीचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “सूनबाई, कम सून !! प्रिय शिवानी, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ! गेले २-३ महिने अविरत कष्ट करते आहेस .. तेही हसतमुखाने… न दमता-न कंटाळता ! “तुला शिकविन चांगलाच धडा” मालिकेतली अक्षरा उर्फ मास्तरीन बाई म्हणून अमाप लोकप्रिय झाली आहेस. आम्हाला तुझ्या यशाचा खूप आनंद आहे. अभिमान आहे ! अशीच यशस्वी हो.. तुझी सारी स्वप्नं पूर्ण होऊ देत ! आनंदी रहा ! खूप खूप प्रेम ! (ता. क.- पण सून, come soon g ! Miss you! तुझे लाड कधी करायचे आम्ही?)

हेही वाचा : शिवानी रांगोळेच्या ऑनस्क्रीन लग्नाबाबत विराजस कुलकर्णीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाला…

दरम्यान, शिवानी सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने ती घरापासून लांब राहत आहे. या मालिकेतील तिच्या कामाचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक होतं. तर आता मृणाल कुलकर्णी यांच्या पोस्टवर कमेंट करत सर्वजण शिवानीवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Story img Loader