Mrunal Dusanis New Business : अलीकडच्या काळात बहुतांश मराठी कलाकारांनी एकीकडे अभिनय क्षेत्रात काम करून दुसरीकडे, वैयक्तिक आयुष्यात नवनवीन व्यवसाय सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. साधारण महिन्याभरापूर्वी अभिनेत्री रेश्मा शिंदेंनी दागिन्यांचं दुकान सुरू केलं, तर ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेने कँडल्सचा बिझनेस सुरू केला आहे. रुपाली भोसलेने सुद्धा नुकतीच व्यवसायासाठी नवीन कार खरेदी केल्याचं सांगितलं. आता या पाठोपाठ मृणाल दुसानिसने देखील तिच्या नवऱ्याच्या साथीने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

मृणाल ( Mrunal Dusanis ) व तिचा पती नीरज मोरे या दोघांनी मिळून काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नवीन व्यवसाय सुरू करत असल्याची हिंट त्यांच्या चाहत्यांना दिली होती. “लवकरच काहीतरी नवीन घेऊन येतोय. तुम्ही गेस करू शकता का?” असं कॅप्शन अभिनेत्रीने तिच्या व्हिडीओला दिलं होतं. आता मृणालने हा व्यवसाय नेमका काय आहे याचा उलगडा केला आहे.

हेही वाचा : Video : ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधील तेजसने सोलापुरी भाषेत मानसीला केलं प्रपोज, म्हणाला, “बार्शी तिथं सरशी…”

मृणाल दुसानिस व तिच्या पतीचा नवीन व्यवसाय

मृणाल दुसानिसच्या पतीने ठाण्यात एक आलिशान बिस्त्रो सुरू केला आहे. अर्थात हॉटेल क्षेत्राशी निगडीत अशा व्यवसायात अभिनेत्रीने पदार्पण केलं आहे. तिच्या या बिस्त्रोचं नाव ‘Belly Laughs’ असं आहे. याठिकाणी खवय्यांना कॉकटेल, मॉकटेल, चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. अभिनेत्रीने सुरू केलेला हा बिस्त्रो ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात आहे. मृणालच्या चाहत्यांनी या नव्या व्यवसायासाठी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : ‘या’ अभिनेत्रीने एकेकाळी सेटवर साफ केला कचरा, पहिलाच सिनेमा झाला फ्लॉप; नंतर एकाच वर्षात दिले आठ सुपरहिट सिनेमे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Mrunal Dusanis New Business
मृणाल दुसानिस व नीरज मोरे यांचा नवीन व्यवसाय ( Marathi Actress Mrunal Dusanis New Business )

दरम्यान, मृणालच्या ( Mrunal Dusanis ) कामाबद्दल सांगायचं झालं तर, यावर्षी मार्च महिन्यात ती अमेरिकेहून मुंबईत परतली. मृणाल पुन्हा भारतात आल्याचा तिच्या तमाम चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. आता लवकरच टेलिव्हिजनची ही लाडकी सून ‘स्टार प्रवाह’च्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या नव्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. यामध्ये तिच्याबरोबर ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. १६ डिसेंबरपासून सायंकाळी ७ वाजता ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल.