Mrunal Dusanis Husband : छोट्या पडद्यावरची लाडकी सून म्हणून मृणाल दुसानिसला ओळखलं जातं. ‘हे मन बावरे’, ‘तू तिथे मी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकांमुळे अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना २०१६ मध्ये अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली. मृणालचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं आहे. लग्नानंतर तिचा पती नीरज कामानिमित्त अमेरिकेला गेला तर, अभिनेत्री जवळपास चार वर्षे भारतातच काम करत होती.

२०१८ ते २०२० या कालावधीत मृणालने ‘हे मन बावरे’ ही मालिका केली. ही मालिका संपल्यावर तिने परदेशाची वाट धरली. यानंतर २०२२ मध्ये अभिनेत्रीने नुर्वीला जन्म दिला. यंदा मार्च महिन्यात तब्बल ४ वर्षांनी मृणाल, तिचा नवरा नीरज व लाडक्या लेकीसह अभिनेत्री भारतात परतली. नुकतीच या दोघांनी दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी करिअरमध्ये सासरच्यांनी कसा पाठिंबा दिला याबद्दल मृणालने ( Mrunal Dusanis ) उलगडा केला आहे.

हेही वाचा : Video : तितीक्षा तावडेचं सासरचं घर पाहिलंत का? दिवाळीच्या दिवशी दाखवली घराची झलक; दारावर आहे खास नेमप्लेट

मृणाल दुसानिस ( Mrunal Dusanis ) म्हणाली, “मला सासरच्यांनी कधीच कामाबद्दल फोर्स केला नाही. लग्न झाल्यावर मी भारतात काम करत होते तेव्हा पण मला कधीच नीरज बोलला नाही की, तू निघून ये वगैरे…तू करिअर सोडून दे असंही नीरजने सांगितलं नाही. मला आता करिअर करू नकोस असंही सासू-सासऱ्यांनी कधीच सांगितलं नाही. मला माझ्या सासरच्या मंडळींकडून खूप पाठिंबा मिळाला. आम्ही दोघंही करिअर ओरिएंटेड आहोत.”

हेही वाचा : प्रतीक्षा संपली! भुवनेश्वरी पुन्हा येणार…; अक्षराला दिसणार सासूबाईंची झलक, ‘या’ दिवशी असणार विशेष भाग, पाहा प्रोमो

Mrunal Dusanis
मृणाल दुसानिस ( Mrunal Dusanis )

हेही वाचा : Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : ‘सिंघम अगेन’ने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नीरज मला सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगायचा मी जसं माझं स्वप्न पूर्ण करतोय…तशी तुझीही स्वप्नं आहेत, तू ती स्वप्न पूर्ण कर… आणि मी त्याचा आदर करतो. या सामंजस्यामुळेच आम्ही सगळं जमवून घेतलं. आमच्या लग्नाला आता ८ वर्षे झाली आहेत. पण, आम्हाला एवढी वर्षं झालीत असं वाटत नाही कारण, सुरुवातीला आम्ही एकमेकांपासून खूप लांब राहिलोय. आधी मी भारतात होते, तो बाहेर होता त्यामुळे आम्ही साधारण मी बाहेरगावी गेल्यावर ४ वर्षे एकत्र राहिलोय. म्हणून आमचं लग्न आम्हाला नवीनच वाटतं.” असं मृणाल दुसानिसने ( Mrunal Dusanis ) सांगितलं.