काही दिवसांपूर्वीच प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला आणि त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं. मुग्धा आणि प्रथमेशने त्यांच्या प्रेमाचा खुलासा केल्यावर अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्याचबरोबर मनोरंजन सृष्टीतील दिग्गज कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आता ते दोघं लग्न कधी करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या लग्नाचा प्लॅन सांगितला आहे.
गेली साडेतीन ते चार वर्षं ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत. आतापर्यंत मुग्धा आणि प्रथमेश अनेकदा एकत्र दिसून आले. तसंच त्यांनी अनेक गाण्याचे कार्यक्रमही एकत्र करत असतात. प्रथमेश आणि मुग्धा यांच्या नात्याबद्दल त्यांच्या आई-वडिलांना अंदाज होताच. त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल घरी सांगितल्यावर घरच्यांची प्रतिक्रिया अगदी साधी होती. गेली अनेक वर्षं ते एकमेकांना ओळखत असल्यामुळे घरच्यांनीही त्यांच्या लग्नाला आनंदाने संमती दिली. आता ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रथमेश व मुग्धाने लग्नाच्या बोलणींबद्दल भाष्य करत ते दोघं लग्न कधी करणार हे सांगितलं आहे.
आणखी वाचा : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचं शिक्षण किती? दोघांची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क
ते दोघं म्हणाले, “आम्ही घरी सांगितल्यावर आई-बाबा लगेच म्हणाले की आता लग्नाची बोलणी कधी करायची? त्यावर आम्ही त्यांना जरा थांबायला सांगितलं. आता आपण एकमेकांचे व्याही होणार आहोत त्यामुळे तसं आपण एकमेकांशी बोलूया अशी आमच्या घरच्यांची बोलणी आहेत झाली आहेत. त्यामुळे लग्नाची तारीख अजून काहीही ठरलेली नाही. पण पुढच्या सहा-आठ महिन्यांमध्ये आम्ही लग्न करू.”
हेही वाचा : “मी प्रथमेशला होकार दिला कारण…”, मुग्धा वैशंपायनने केला खुलासा
दरम्यान, मुग्धा आता २३ वर्षांची आहे. तिच्या आणि प्रथमेशच्या वयामध्ये चार ते पाच वर्षांचं अंतर आहे आणि प्रथमेशला त्याच्या तीशीमध्ये लग्न करायचं नाही. त्याला त्याच्या आधी लग्न करायचं आहे. याचबरोबर मुलीने लग्न करण्यासाठी २३ हे पूर्वापार चालत आलेलं योग्य वय आहे, असं त्यांना वाटतं. त्यामुळे आता ते दोघं त्यांच्या लग्नाची तारीख कधी जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.