‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी काही दिवसांपूर्वीच एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला आणि त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं. मुग्धा आणि प्रथमेशने त्यांच्या प्रेमाचा खुलासा केल्यावर अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. तर त्यानंतरही सोशल मीडिया वरून ते दोघ त्यांच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्सच्या त्यांना देत आहेत.

प्रथमेश आणि मुग्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या दोघांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते देखील खूप उत्सुक असल्याचे दिसतं. आता सर्वांचं लक्ष त्यांच्या लग्नाकडे लागलं आहे. त्यांच्या केळवणांना काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली. आता अशातच ते दोघं पावसाचा आनंद घेताना दिसले.

आणखी वाचा : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचं शिक्षण किती? दोघांची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क

प्रथमेश आणि मुग्धा यांनी नुकताच सोशल मीडियावरून त्या दोघांचा एक फोटो शेअर केला. यामध्ये ते दोघं एका नदीमध्ये असलेल्या मोठ्या दगडावर बसलेले दिसत असून पावसात भिजताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी बारिश या लोकप्रिय गाण्याच्या ओळी कॅप्शन म्हणून लिहिल्या.

हेही वाचा : ‘अशी’ सुरु झाली मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची लव्हस्टोरी, म्हणाले, “घरी सांगितलं तेव्हा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांची ही पोस्ट आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी कमेंट करत विविध प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं, “सुरात सूर जुळले बुवा.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, ” आता बार उडवून टाका.” तर आणखी एकाने लिहिलं, “अजून फक्त थोडे दिवस.”