‘मुरांबा’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’वरील काही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर व अभिनेता शशांक केतकर मुख्य भूमिकांमध्ये आहेत. ते रमा-अक्षय या भूमिका साकारत असून. ही जोडी छोट्या पडद्यावरील सुपरहिट जोड्यांपैकी एक आहे.
मालिकेत रमा म्हणजेच शिवानी साडी आणि त्यावर दोन वेण्या अशा लूकमध्ये पाहायला मिळते. परंतु, खऱ्या आयुष्यात अभिनेत्री वेगवेगळे फोटोशूट करताना दिसते. शिवानी अनेकदा वेगवेगळ्या लूकमधील तिचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करीत असते. अशातच तिने नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीला शिवानी पारंपरिक साडीमध्ये दिसत असून ट्रान्स्फॉर्मेशननंतर तिने वेस्टर्न ड्रेस परिधान केल्याचे दिसतेय. यावेळी शिवानी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. पारंपरिक कपड्यांसह ती पाश्चिमात्य कपड्यांनाही पसंती देताना दिसते. शिवानी शेअर करीत असलेल्या फोटोंना चाहत्यांचाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्स केलेल्या आहेत. काहींनी खूप छान, गोड दिसतेयस, असं म्हटलं आहे. परंतु, एका नेटकऱ्यानं या व्हिडीओखाली, “तुझं सौंदर्य साडीतच खुलून दिसतं”.तर दुसऱ्यानं, “दोन वेण्यांमध्ये जास्त गोड दिसतेस”, असं म्हटलं आहे.
यासह ‘मुरांबा’ मालिकेतही शिवानी रमा व माही अशा दुहेरी भूमिका साकारताना दिसली. तर, माही व रमा या दोन्ही भूमिका एकमेकींपासून अगदी विरुद्ध असल्याने एकाच वेळी ती दोन वेगळ्या लूक्समध्ये पाहायला मिळायची. रमाची भूमिका साकारताना साडीमध्ये; तर माहीची भूमिका साकारताना मात्र वेगवेगळ्या पाश्चिमात्य लूक्समध्ये पाहायला मिळाली होती.
अशातच आता ‘मुरांबा’ या मालिकेत लवकरच अक्षय्य तृतीयेनिमित्त विशेष भाग पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपासून मालिकेत वेगळं वळण आल्याचं पाहायला मिळालं. कथेत आलेल्या मोठ्या ट्विस्टनंतर रमा-अक्षय एकमेकांपासून दुरावले होते. त्यामुळे त्यांचे चाहते या जोडीला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक होते.
दरम्यान, शिवानी मुंढेकर ही मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. ‘मुरांबा’ ही तिची पहिलीच मालिका असली तरी या मालिकेत रमा हे पात्र साकारत तिनं तिच्या सहज अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं आहे. तर ‘मुरांबा’ या मालिकेलादेखील नुकतीच तीन वर्षं पूर्ण झाली आहेत. या मालिकेनं जवळपास १००० भागांचा टप्पा गाठला आहे.