Muramba Upcoming Twist : ‘मुरांबा’ मालिकेत सध्या नवनवीन गोष्टी घडताना दिसत आहेत. सात वर्षांनी मालिका पुढे गेल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्याचे पाहायला मिळत आहे.
अक्षय आणि मुकादम कुटुंबापासून रमा दूर झाली आहे. इरावतीआत्याच्या कट-कारस्थानामुळे रमा व तिच्या कुटुंबामध्ये, रमा-अक्षयमध्ये दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षय पूर्वीपेक्षा बदलला आहे. सात वर्षांच्या मुलीच्या वडिलांची जबाबदारी तो निभावताना दिसत आहे. त्यामुळे तो कधी रागीट, कधी प्रेमळ, कधी समजूतदार, तर कधी कडक शिस्तीचा, अशा अक्षय विविध रूपांत पाहायला मिळतो.
तर रमा ही मुकादम कुटुंबापासून दूर पाचगणीमध्ये राहत असल्याचे पाहायला मिळते. सात वर्षांच्या कालावधीत रमा बदलली आहे. काही जबाबदाऱ्या तिने स्वत: घेतल्या आहेत. तिच्या दोन वेण्यांच्या जागी मोकळे केस दिसत आहेत. पूर्वीपेक्षा एक आत्मविश्वासू रमा पाहायला मिळत आहे. दुरावा असला तरी तिला तिच्या मुलीची आरोही आणि अक्षयची सतत आठवण येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट
आता दुरावलेले रमा-अक्षय आणि रमा व आरोही यांची भेट होणार, अशी उत्सुकता वाढवणारा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर मुरांबा या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, अक्षय देवीच्या मंदिरात गेला आहे. तो तेथील भिंतीवर धागा बांधत असल्याचे दिसते. तो धागा बांधत असतानाच तो देवीशी मनातल्या मनात संवाद साधत असल्याचे दिसत आहे. तो म्हणतो, असं म्हणतात की, तुझ्या दारात बांधलेला हा धागा मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. माझी लेक आरोहीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत.
यादरम्यानच रमादेखील त्याच मंदिरात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. ती देवीचे दर्शन घेते. तितक्यात तिचे लक्ष तिथे बांधलेल्या धाग्याकडे जाते. तो सुटत असतो. रमा तो धागा पुन्हा बांधते आणि मनातल्या मनातल्या म्हणते की, कोणीतरी हा धागा आशेने बांधला आहे. तो असा अर्धवट कसा राहील? हा धागा ज्याने कोणी बांधला आहे, त्याची इच्छा पूर्ण कर आई. रमा आणि अक्षय एकाच वेळी देवीच्या पाया पडतात; पण दोघांच्या मध्ये भिंत असल्याचे दिसत आहे.
शेवटी ते एकमेकांकडे बघत असल्याचे दिसत आहे. पण, ते एकमेकांना ओळखणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, हा धागा आणेल का रमा-अक्षयला पुन्हा एकत्र? अशी कॅप्शन पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आता आरोहीला तिची आई भेटणार का? रमाला तिच्या मुलीची ओळख पटणार का? रमा-अक्षय समोरासमोर येणार का? त्यांच्यातील गैरसमज कधी दूर होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.