Surbhi Jyoti Boyfriend Sumit Suri: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री ‘नागिन’ फेम सुरभी ज्योती लग्नबंधनात अडकणार आहे. सुरभी तिचा बॉयफ्रेंड सुमित सुरीशी याच महिन्यात लग्न करणार आहे. सुमित व सुरभी बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ते डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. त्यांच्या लग्नाची तारीख व ठिकाणाबद्दल जाणून घेऊयात.

‘कबूल है’, ‘तनहाइयां’, ‘लौट के कोई आया है’, ‘इश्कबाज’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘ये जादू है जिन का’, ‘देव’, ‘लव्ह लूक व्हाट यू मेड मी डू’ या मालिकांसाठी सुरभी ओळखली जाते. तिने ‘नागिन’ मालिकेतही काम केलं आहे.

हेही वाचा – फक्त एक चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात अक्षय कुमारचा केलेला अपमान? अभिनेत्याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

कधी आणि कुठे आहे लग्न?

रिपोर्ट्सनुसार, सुरभी आणि सुमित या महिन्यात २७ ऑक्टोबरला लग्न करणार आहेत. हे जोडप्याच्या लग्नाला फक्त त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र हजर असतील. हे डेस्टिनेशन वेडिंग असेल, ज्यासाठी या दोघांनी खास जागा निवडली आहे. सुरभी उत्तराखंडमध्ये तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न करणार आहे. दोघांनी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये लग्नासाठी रिसॉर्ट बुक केले आहे. मनी कंट्रोलने हे वृत्त दिलंय.

हेही वाचा – “मी स्पष्टीकरण देण्यासाठी जन्मलेले नाही”, निक्की तांबोळीचे वर्षा उसगांवकरांबद्दल स्पष्ट वक्तव्य; म्हणाली, “त्यांचे पाय धरून…”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ३६ वर्षीय सुरभीला आधी राजस्थानमध्ये लग्न करायचे होते, त्यासाठी तिने उदयपूरमधील काही ठिकाणंही पाहिली होती. मात्र ती तिला आवडली नाहीत, त्यानंतर तिने लग्नासाठी देवभूमी उत्तराखंडची निवड केली.

सुरभी व सुमित या दोघांच्या अफेअरच्या बातम्या २०१८ पासून समोर येत आहे, मात्र त्यांनी कधीच जाहीरपणे याची कबुली दिलेली नाही. हे दोघेही म्युझिक व्हिडिओच्या शूट दरम्यान भेटले आणि तेव्हापासून सोबत आहेत.

हेही वाचा – बॉलीवूड अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, पतीबरोबर केला गृहप्रवेश, पाहा घराची झलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अभिनेत्यांशी जोडलं गेलेलं सुरभी ज्योतीचं नाव

सुमीत सूरीपूर्वी सुरभी ज्योतीचे नाव अभिनेता पर्ल पुरीशीही जोडले गेले होते. दोघांच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या, पण सुरभीने त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. ती व पर्ल दोघेही चांगले मित्र आहेत, असं तिने म्हटलं होतं. तसेच सुरभीचे नाव आशा नेगीचा एक्स बॉयफ्रेंड अभिनेता रित्विक धजनानीबरोबर जोडले गेले आहे, मात्र ते दोघेही फक्त चांगले मित्र आहेत. सुरभीचा होणारा पती व रित्विक धनजानी दोघांचीही चांगली मैत्री आहे.