छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘खुपते तिथे गुप्ते’. अवधुत गुप्तेच्या या कार्यक्रमाचं हे तिसरं सीझन आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. कार्यक्रमाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता याचं तिसरं सीझन आता प्रदर्शित करण्यात आलं आहे. या नव्या सीझनमध्ये बरीच राजकीय मंडळी सहभागी होताना दिसणार आहेत.

‘खुपते तिथे गुप्ते’च्या पहिल्या भागामध्येच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या पहिल्याच भागाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आता या कार्यक्रमाच्या येणाऱ्या भागामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे हजेरी लावताना दिसणार आहेत. यावेळी ते अनेक राजकीय विषयांवर भाष्य करताना दिसतील.

आणखी वाचा – “१५०० रुपये मानधन सांगून ७०० रुपये दिले अन्…” संकर्षण कऱ्हाडेने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव, म्हणाला, “मी ते पैसे त्यांच्या…”

झी मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे कार्यक्रमाचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये नारायण राणे बेधडक उत्तर देताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये त्यांना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत एक व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडीओमध्ये संजय राऊत नारायण राणे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर नारायण राणे यांनी उत्तर दिलं.

आणखी वाचा – “देखणा पैलवान माझ्या आयुष्यात होता पण…” सई ताम्हणकरने अफेअरबाबत केला होता खुलासा, म्हणालेली, “आम्ही अजूनही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नारायण राणे मागचा पुढचा विचार न करता फक्त पोपटासारखे बोलत असतात. बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनाप्रमुख म्हणून मीच नेमलं हेच सांगायचं यांनी आता बाकी ठेवलं आहे” असं संजय राऊत त्या व्हिडीओमध्ये म्हणतात. या व्हिडीओला नारायण राणेंनी उत्तर दिलं. ते म्हणाले, “याला खासदार मी केलं आहे. नाहीतर हा खासदार झालाच नसता. उलट हे माझं पाप आहे”. प्रोमोवरुनच नारायण राणेंचा हा भाग अधिर रंगतदार होणार असं दिसत आहे.