छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने प्रेक्षकांना आपलसं केलं. ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. या मालिकेमधील बालकलाकार साईशा भोईरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ‘रंग माझा वेगळा’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या साईशाने काही महिन्यांपूर्वीच या मालिकेचा निरोप घेतला. आता झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेमध्ये ती काम करत आहे.

आणखी वाचा – Inside Photos : कधीकाळी अगदी लहान घरामध्ये राहणाऱ्या आदेश बांदेकर यांचं आलिशान घर आहे फारच सुंदर, पाहा फोटो

साईशाच्या घरी आता आलिशान कार आली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आपल्या नव्या कारचा फोटो व व्हिडीओ शेअर केला आहे. तिची ही कार खूप महागडी आहे हे व्हायरल व्हिडीओ व फोटोंमधून दिसून येतं.

भोईर कुटुंबाने आलिशान रेंज रोव्हर कार खरेदी केली आहे. या कारची किंमत ५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. या व्हिडीओमध्ये साईशाचे आई-बाबा तिच्या हातून नव्या कारची पूजा करताना दिसत आहेत. शिवाय तिच्या पायांचे ठसे कारवर दिसत आहेत.

आणखी वाचा – “चित्रपटात खोटा इतिहास दाखवून पैसा…” मराठी दिग्दर्शकाचं ऐतिहासिक चित्रपटांबाबत मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान घरावर राज्य असणाऱ्या एकीचा अर्धवट राहिलेला संसार पूर्ण करायला दुसऱ्या बायकोवर आलेलं राज्य म्हणून या मालिकेचं नाव ‘नवा गडी नवं राज्य’ आहे असं ठेवण्यात आलं आहे. या मालिकेमधून एक वेगळाच विषय प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. यामध्ये साईशा साकारत असलेली भूमिकाही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे.