Vallari Viraj Talk’s About Future Kids : वल्लरी विराज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती, यामुळे ती घराघरांत पोहोचली. अशातच आता अभिनेत्रीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यामध्ये अभिनेत्रीने तिची एक इच्छा व्यक्त केली आहे.
वल्लरी विराज व ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये रेवती ही भूमिका साकारणारी अभिनेत्री आलापिनी निसळने नुकतीच एकत्र एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांची मैत्री कशी झाली, त्यादरम्यानचे किस्से व भविष्यातील इच्छा सांगितल्या आहेत. या दोघींनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे.
वल्लरी व आलापिनी यांना या मुलाखतीमध्ये एकमेकींच्या बकेट लिस्टमधील गोष्टी सांगायच्या आहेत, असा प्रश्न विचारण्यात आलेला. यावर आलापिनीने आधी वल्लरीच्या बकेट लिस्टमधील गोष्टींबद्दल सांगितलं. आलापिनी म्हणाली, “तिला घोडा हवा आहे. खऱ्या आयुष्यात तिला घोडा खरेदी करायचा आहे. दुसरी आम्हाला दोघींना एकत्र पॅरिस ट्रीपला जायचं आहे. ही आमच्या दोघींचीही ईच्छा आहे.”
वल्लरी विराजला हवी आहेत जुळी मुलं
आलापिनी पुढे म्हणाली, “तिची तिसरी बकेट लिस्ट आहे, तिला जुळी मुलं हवी आहेत.” यावर वल्लरीने मान डोलावत हो असं म्हटलं. वल्लरी विराजला भविष्यात जुळी मुलं हवी आहेत, असं तिने यामधून सांगितलं आहे. पुढे या दोघींनी एकमेकींबद्दलचे अनेक भन्नाट किस्से व आठवणी सांगितल्या.
वल्लरी विराज व आलापिनी निसळ यांची पहिली भेट ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेमुळे त्यांच्यात घट्ट मैत्री झाली. पुढे मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान दोघी एकत्र राहत होत्या, त्यादरम्यान त्यांचं नातं अधिक घट्ट झालं. तर आलापिनीसाठी वल्लरी तिच्या मोठ्या बहिणीसारखी आहे. याबाबत तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
दरम्यान, वल्लरी व आलापिनी या दोघी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. तिथे त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. मालिकेतील त्यांची ऑनस्क्रीन बहिणींची केमिस्ट्री खऱ्या आयुष्यातसुद्धा तशीच असल्याचं त्यांच्या सोशल मीडियावरील रील व फोटोंमधून पाहायला मिळतं. दोघी अनेकदा वेगवेगळ्या डान्स रीलही बनवत असतात. मध्यंतरी त्यांनी बनवलेली रील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती.