कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा तिसरा सीझन येत्या २१ जूनपासून नेटफ्लिक्सवर प्रीमियर होणार आहे.

जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली तेव्हा चाहत्यांना खूप आनंद झाला. यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू कायमचे पाहुणे म्हणून परतले आहेत. ते सुमारे सहा वर्षांनी कपिलच्या शोमध्ये दिसणार आहेत. नवज्योत सिद्धू गेल्यानंतर अर्चना पूरण सिंह यांनी कपिलच्या शोमध्ये प्रवेश केला, पण आता नवज्योत सिंग सिद्धूदेखील आले आहेत.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी सांगितले की, जेव्हा नेटफ्लिक्सने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सीझनसाठी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी अर्चना पूरण सिंह यांच्याबाबत एक अट ठेवली. त्यांनी नेटफ्लिक्सला अर्चना यांनाही शोमध्ये ठेवण्यास सांगितले.

नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले, “जेव्हा अर्चना पूरण सिंह यांच्याबाबत बोलले तेव्हा मी फक्त एक गोष्ट सांगितली की, मी दुर्गा देवीचा भक्त आहे, मी त्यांची नोकरी गमावण्याचे कारण कसे असू शकतो? मी निर्मात्यांना त्यांना (अर्चना पूरण सिंह) शोमध्ये ठेवण्याची विनंती केली आणि आता आम्ही दोघेही शोमध्ये एकत्र दिसणार आहोत. आम्ही अखेर पुन्हा एकत्र आलो आहोत. सुनील ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक… आम्ही सर्व एकाच इंजिनचा भाग आहोत.’

नेटफ्लिक्सने अलीकडेच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सीझनचा प्रोमो शेअर केला, ज्यामध्ये कपिल व्यतिरिक्त अर्चना पूरण सिंह आणि नवज्योत सिंग सिद्धू दिसले होते. प्रोमो शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, “एक कुर्सी पाजी के लिए प्लीज. अर्चना पूरण सिंह आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पुनरागमनासह आमचे कुटुंब प्रत्येक फनीवारमध्ये वाढेल.”

…म्हणून नवज्योत सिंग सिद्धू यांना कपिल शर्माचा शो सोडावा लागला

‘द ग्रेट इंडियन कपिल शो ३’ २१ जूनपासून रात्री ८ वाजता नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल. यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. २०१९ मध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांनी शो सोडला. त्यानंतर त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल एक टिप्पणी केली होती, ज्यावर जोरदार टीका झाली होती. सिद्धू म्हणाले की, राजकीय कारणांमुळे त्यांना कपिल शर्माचा शो सोडावा लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.