‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरताना दिसत आहे. मालिकेत येणाऱ्या ट्विस्टमुळे या मालिकेबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढताना दिसते. त्याबरोबरच मालिकेच्या शूटिंगदरम्यान काय घडते, सहकलाकारांमध्ये कसा बॉण्ड आहे, शूटिंगदरम्यान नेमके काय घडत असते, काय गमती-जमती होतात, हे जाणून घेण्यासाठीसुद्धा प्रेक्षक उत्सुक असतात. सध्या सोशल मीडियामुळे मालिकांच्या सेटवर काय घडते, हे जाणून घेणे सहज शक्य झाले आहे. मालिकेतील कलाकार अनेकदा सोशल मीडियावर सेटवरील फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतात. आता नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील विक्रांत व यशची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्याने शेअर केले शूटिंगचे फोटो

अभिनेता रुचिर गुरवने सोशल मीडियावर अभिनेता अद्वैतबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. ‘नवरी मिळे हिटलराला’ मालिकेत रुचिरने यशची, तर अद्वैतने विक्रांतची भूमिका साकारली आहे. या फोटोंमध्ये यशला विक्रांतने किडनॅप केल्याचे पाहायला मिळाले आहे. काही फोटोंमध्ये ते गंभीर, तर काही फोटोंमध्ये ते हसत असताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांसह कलाकारांनीदेखील कमेंट्स करीत प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळत आहे.

रुचिरने शेअर केलेल्या या फोटोंवर अभिनेत्री मुग्धा कर्णिक यांनी कमेंट करीत लिहिले, “मेरे दो अनमोल रतन. लव्ह यू सो मच”, असे म्हणत त्यांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. याचबरोबर अनेक चाहत्यांनीदेखील त्यांच्या फोटोंवर कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “सारखा सारखा काय किडनॅप होतोस”, असे म्हणत हसणाऱ्या इमोजी शेअर केल्या आहेत. आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “रेवूच्या प्रेमात दोघे मार खाणार आहेत”, तर याच मालिकेत विराजची भूमिका साकारणारा अभिनेता राजदीप याने रुचिरला टॅग करीत लिहिले, “काश, या सीनमध्ये तुझा माणूस असतो.”

हेही वाचा: EMI भरण्यासाठी नावडते चित्रपट केले; विवेक ओबेरॉय म्हणाला, “यशाचं मोजमाप वाढदिवसाला येणाऱ्या पुष्पगुच्छांच्या संख्येवरून…”

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, यश हा दुर्गाचा भाऊ आहे; तर विक्रांत हा सरस्वतीचा भाऊ आहे. लीलाची बहीण रेवतीच्या प्रेमात पडल्याचे नाटक सुरुवातीला विक्रांतने केले होते. मात्र, त्याचे लग्न झाले असून, विक्रांत रेवतीला फसवत होता. लीलाला हे समजते. शेवटी विक्रांतने त्याच्या बायकोला व लीलाला किडनॅप केले होते. त्यानंतर एजेने लीलाला वाचवले होते आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले होते. आता यश व रेवती एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे दिसत आहे. आता समोर आलेल्या फोटोंमुळे मालिकेत काय होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागल्याचे दिसत आहे.