चित्रपट, टीव्ही मालिका यांमध्ये दिसणारे कलाकार हे त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळेदेखील मोठ्या चर्चेत असतात. आता नवरी मिळे हिटलरला या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणाऱ्या वल्लरी विराजने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री वल्लरी विराज ही ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून घराघरांत पोहोचली आहे. मालिकेतील तिच्या भूमिकेबरोबरच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टलादेखील चाहत्यांचे प्रेम मिळताना दिसते. बालदिनी वल्लरीने तिच्या लहानपणीचे दोन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या दोन्ही फोटोंमध्ये तिने साडी नेसलेली आहे. पहिल्या फोटोमध्ये ती एका ठिकाणी बसली असून, तिच्या हातात एक बाहुली आहे. तर, दुसऱ्या फोटोत ती हसताना दिसत आहे. वल्लरीला लहानपणापासून किंवा तिसऱ्या वर्षापासूनच नटायची, पारंपरिक पोशाखाची खूप आवड होती. तिचा वेगवेगळे पोशाख परिधान करण्याचा तेव्हापासून सुरू झालेला प्रवास हा अजूनही संपलेला नाही, असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

इन्स्टाग्राम

वल्लरीचे बालपणीचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. “किती गोड”, “अशीच आयुष्यभर हसत राहा”, “क्यूट”, अशा कमेंट्स करीत चाहत्यांनी तिचे कौतुक केल्याचे दिसत आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’मधील लीलाची भूमिका

सध्या वल्लरी नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीला ही भूमिका साकारत आहे. वेंधळी, उत्साही, खंबीर, तिला कोणी चॅलेंज दिले, तर ती गोष्ट करून दाखवणारी, असे हे पात्र आहे. या मालिकेची विशेष बाब ही आहे की, सासूचे वय हे सुनांपेक्षा कमी आहे. वेंधळ्या असणाऱ्या लीलाचे परफेक्ट एजेबरोबर लग्न होते. त्यानंतर अनेक गमतीजमती मालिकेत पाहायला मिळत आहे. अनेकदा भावनिक होऊन निर्णय घेणारी, सुनांचे ऐकणारी लीला वेळप्रसंगी खंबीरपणे वागते, असे या मालिकेत पाहायला मिळते. नुकतीच तिने एजेची जेलमधून सुटका केल्याचे पाहायला मिळाले.

श्वेताला एजेबरोबर लग्न करायचे होते; मात्र तिच्या जागी लीला मंडपात बसली आणि तिने एजेबरोबर लग्न केले. याचा राग श्वेताच्या मनात आहे. त्यामुळे एजेने लग्नाला नकार दिल्यावर ती औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करते. त्यामुळे एजेला तुरुंगात जावे लागते. एजेला तिथून बाहेर काढण्यासाठी लीला आजीच्या मदतीने एक योजना आखते. “एजेबरोबर श्वेताचे लग्न लावून द्यायला तयार असून, त्या बदल्यात तिला पोलिसांतील तक्रार मागे घ्यावी लागेल”, असे आजी श्वेताला सांगते. त्यांची ही योजना यशस्वी होते आणि एजेची सुटका होते. त्याबरोबर रेवती आणि दुर्गाचा भाऊ यांनी श्वेताच्या दवाखान्यातील रूममध्ये पुरावा गोळा करण्यासाठी माईक लावलेला होता. मात्र, आता तो दुर्गाच्या नवऱ्याच्या हाती लागला आहे. त्यामुळे लीला आता काय करणार, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

हेही वाचा: “एक पक्ष १५०० देतोय, दुसरा ३ हजार देणार, पण…”, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश ओक यांनी विचारले दोन ‘भाबडे’ प्रश्न; पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.