टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका या प्रेक्षकांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असतात. मालिकेच्या पुढच्या भागात काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. काही मालिका आपल्या वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करतात. नवरी मिळे हिटलरला ही मालिका यापैकी एक आहे. या मालिकेतील कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आता ‘झी मराठी वाहिनी’ने, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये लीलाच्या सुना तिच्याविरुद्ध कट करताना दिसत आहेत.

लीलाच्या सुनांचा नवीन प्लॅन

झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला, लीलाच्या दोन सुना म्हणजेच सरस्वती आणि लक्ष्मी तिच्याविरुद्ध कट करतात. सरस्वती म्हणते, “आता आपण असं काहीतरी करायचं, ज्यामुळे एजेंना लीला आवडेनाशी होईल.” सरस्वतीच्या या बोलण्यावर लक्ष्मी म्हणते, “आता आपण तिला अख्खा सिनेमा दाखवायचा.” त्यावर सरस्वती अॅक्शन म्हणते. त्या दोघी लीलाच्या रुममध्ये पोहचतात आणि लीलाचे पाय धरतात. त्यावर लीला त्यांना म्हणते, “काय चाललंय?” त्यावर लक्ष्मी म्हणते, “हे बघ आमचं खरंच खूप चुकलं, तू प्लीज आम्हाला माफ कर.” लगेच सरस्वती म्हणते, “आणि तुझ्याविरुद्ध आम्ही जी कटकारस्थानं केली, ती करायला नव्हती पाहिजे. खरंच चूक झाली आमची.” त्यांच्या या बोलण्यावर लीला म्हणते, “याआधीसुद्धा तुम्ही कितीतरी वेळा माझ्याशी गोड बोललात आणि माझी फसवणूक केली. नक्कीच हा सुद्धा तुमचा काहीतरी प्लॅन असेल” त्यावर लक्ष्मी म्हणते, “जर तुला आमच्यावर विश्वास नसेल तर तू आमची परीक्षा घे.” लीला म्हणते, “कान धरा, चला उठाबशा काढा” त्यानंतर लक्ष्मी आणि सरस्वती उठाबशा काढताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

इन्स्टाग्राम

आता मालिकेत नवीन ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. लीला एजेच्या प्रेमात पडली असून ती लवकरच एजेला तिच्या मनातील भावना सांगणार असल्याचे तिने म्हटले आहे. मात्र तिच्या सुना तसे होऊ देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: “मी कधीच लिपस्टिक…”, अभिनेत्री कतरिना कैफचे वक्तव्य; म्हणाली,”मेकअपमुळे मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लीला एजेला तिच्या भावना सांगणार का?लीला आणि एजेमध्ये दुरावा आणण्यासाठी तिच्या सुना काय करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे.