Navri Mile Hitlerla Fame Actress Vallari Viraj : ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका मार्च २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. वर्षभर प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर या मालिकेने २५ मे २०२५ रोजी सर्वांचा निरोप घेतला. मालिका ऑफ एअर झाल्यावर या शोचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. या सिरियलमधील कलाकारांबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री वल्लरी विराज आणि अभिनेता राकेश बापट यांची फ्रेश जोडी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

वल्लरीने साकारलेली लीला आणि राकेश बापटने साकारलेला अभिराम जहागीरदार म्हणजेच AJ या दोन्ही पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिका संपल्यावर या मालिकेचे चाहते सगळ्याच कलाकारांना खूप मिस करत आहेत.

याचदरम्यान, मालिकेची नायिका वल्लरीने नुकतंच सोशल मीडियावर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. या सेशनमध्ये अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांनी काही हटके प्रश्न विचारले.

अभिनेत्रीला एका चाहत्याने “तू अभिनेत्री नसतीस तर, काय केलं असतं? अभिनयाशिवाय कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची तुझी इच्छा होती?” असा प्रश्न विचारला. यावर वल्लरीने, “मी अभिनेत्री नसते तर निश्चितच डॉग ग्रुमर म्हणून काम केलं असतं किंवा प्राण्यांच्या संबंधित क्षेत्रातच कार्यरत असते.” असं उत्तर दिलं. वल्लरीचा स्वतःचा एक छोटा व्यवसाय देखील आहे; जो प्राण्यांशी संबंधित आहे. वल्लरीचं पेट ग्रुमिंग सलोन आहे. Bath and Barks असं तिच्या सलोनचं नाव आहे.

याशिवाय वल्लरीच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचं झालं, अभिनेत्री पदवीधर असून BFM Graduate (बॅचलर ऑफ फायनान्शियल मार्केट्स, Bachelor of Financial Markets) या विषयात तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
navri mile hitlerla fame actress vallari viraj
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्री वल्लरी विराज

दरम्यान, अभिनेत्रीला या ‘आस्क मी सेशन’मध्ये एका नेटकऱ्याने, “नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कोणाला मिस करतेस?” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्रीने आलापिनी निसळ, भूमिजा पाटील आणि सानिका काशीकर या तिघींची नावं घेतली. तसेच सध्याच्या घडीला १५ पाळीव प्राण्यांचा सांभाळ करत असल्याचंही वल्लरीने चाहत्यांना सांगितलं आहे.