Sanika kashikar and Bhumija Patil Video: अभिनेत्री सानिका काशिकर आणि भूमिजा पाटील या झी मराठी वाहिनीच्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेत दिसल्या होत्या. सानिकाने लक्ष्मीची, तर भूमिजाने सरूची भूमिका साकारली होती.

मालिकेत लक्ष्मी व सरू या तिच्या सासूविरुद्ध म्हणजेच लीलाविरुद्ध कट-कारस्थान करताना दिसल्या होत्या. जरी सरूने मालिकेत नकारात्मक भूमिका केली असली तरी तिचे चुकीच्या म्हणी, तसेच तिचा भोळा स्वभाव यांमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. मालिकेतील या अभिनेत्रींचा बॉण्ड ऑफस्क्रीनदेखील चांगला असल्याचे पाहायला मिळते.

‘नवरी मिळे हिटलरला’ नंतर लक्ष्मी आणि सरस्वती दिसल्या एकत्र

सानिका काशिकर व भूमिजा पाटील यांचा पडद्यावर जितका चांगला बॉण्ड दिसत होता, तसेच त्यांचे ऑफस्क्रीनसुद्धा एकमेकांशी उत्तम नाते आहे. कलाकारांच्या व्लॉगमध्येदेखील त्या एकमेकींच्या खास मैत्रिणी असल्याचे पाहायला मिळाले. आता मालिकेनंतर या दोन अभिनेत्री पुन्हा एकदा एका व्हिडीओमध्ये एकत्र दिसल्या आहेत.

अभिनेत्री सानिका काशिकरने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये दोघींनी सुंदर साड्या नेसल्या आहेत. तसेच त्यांनी सुंदर मेकअपही केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला दोघी नृत्य करताना दिसत आहेत. त्यानंतर त्या एकमेकींना आवरण्यासाठी मदत करीत असून गोड हसत असल्याचे दिसत आहेत. त्यांचा लूक लक्ष वेधून घेत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना सानिकाने जेव्हा मी माझ्या मैत्रिणीबरोबर असते अशा आशयाची कॅप्शन लिहिली आहे. तसेच भूमिजाला टॅगदेखील केले आहे.

सानिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री अक्षय हिंदळकरने सुंदर अशी कमेंट केली आहे. नवरी मिळे हिटलरला या मालिकेत दिसलेला अभिनेता रुचिर जाधवने लिहिले की, इन्स्टाग्रामच्या आधी मला हा व्हिडीओ पाहायला मिळाला, हा मला मिळालेला विशेषाधिकार आहे. तर आणखी एकाने लिहिले की, तुम्ही दोघीही खूप सुंदर दिसत आहात. भारती पाटील यांनी किती सुंदर, अशी कमेंट करीत दोन्ही अभिनेत्रींचे कौतुक केले आहे.

तसेच,”या माझ्या दोन्ही गोड मुलींना नजर नको लागायला”, “खूप सुंदर”, “मस्त”, अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, सानिका आणि भूमिजा दोघीही सोशल मीडियावर सक्रिय असतात. दोन्ही अभिनेत्री त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करीत असतात. आता नवरी मिळे हिटलरला या मालिकेनंतर त्या कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे