Vallari Viraj And Aalapini Nisal Shares Dance Video : मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हे आता केवळ नाटक, मालिका आणि चित्रपटांमधूनच नव्हे तर सोशल मीडियाद्वारेही प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात. सोशल मिडियावर ही कलाकार मंडळी त्यांच्या कामाबद्दलची माहिती, तसंच स्वत:चे काही फोटो व्हिडीओ शेअर करत असतात.

कलाकारांच्या या फोटो-व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो. अशीच सोशल मीडियावर कायम सक्रीय असणारी जोडी म्हणजे अभिनेत्री वल्लरी विराज आणि अभिनेत्री आलापिनी निसळ. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिकेत या दोघींचं नातं जितकं सुंदर होतं, तितकंच ते नातं ऑफस्क्रीनसुद्धा सुंदरच आहे.

मालिकेत लीलाची भूमिका करणारी वल्लरी आणि लीलाची बहीण रेवतीची भूमिका करणारी आलापिनी या दोघीही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर दोघी त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. दोघींच्या डान्सला चाहत्यांकडूनही विशेष पसंती मिळत असते.

अशातच दोघींनी सोशल मीडियावर एका मराठी गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे. संदीप खरे यांचं काव्य असलेल्या ‘मन तळ्यात… मळ्यात…’वर वल्लरी व आलापिनी यांनी सुंदर असं नृत्य सादरीकरण केलं आहे आणि या सादरीकरणाचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये डेटवर जाण्यासाठी उत्सुक असलेली वल्लरी आणि यासाठी तिला तयार करणाऱ्या आलापिनीचं खास सादरीकरण पाहायला मिळत आहे. या सादरीकरणातील त्यांच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्स चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. तशा प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ डान्स व्हिडीओ

केवळ चाहतेच नव्हे तर अनेक कलाकार मंडळींनी सुद्धा वल्लरी आणि आलापिनी यांच्या या नृत्यसादरीकरणाचं कौतुक केलं आहे. “एकही शब्द न बोलता काय छान भावना सांगितल्या आहेत”, “किती गोड”, “खूप… खूप… सुंदर”, “तुमचा अभिनय आणि डान्स; सगळंच उत्तम आहे” या आणि अशा अनेक प्रतिक्रियांद्वारे चाहत्यांनी दोघींचं कौतुक केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत या दोघींची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना कायमच आवडली. मालिका संपल्यानंतरही या दोघी एकमेकींच्या संपर्कात आहेत आणि याचे खास क्षण त्या शेअर करताना दिसतात. अशातच त्यांचा हा नृत्य सादरीकरणाचा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.