Navri Mile Hitlerla Upcoming Twist: ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. एजेची पहिली पत्नी अंतराच्या येण्याने एजे-लीलाच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपू्र्वीच लीलाच कधीच आई होऊ शकत नाही, असे रिपोर्ट्स आले होते. त्यामुळे लीलासह आजीलादेखील दु:ख झाले होते. यामुळे आजी व लीला यांच्यात दुरावा निर्माण होईल, असे किशोर व दुर्गाला वाटले होते. त्यासाठी त्यांनी ते रिपोर्ट आजीच्या हाती लागतील अशा ठिकाणी ठेवले. ते रिपोर्ट्स पाहिल्यानंतर आजीला दु:ख झाले, पण त्यांच्यात दुरावा निर्माण झाला नाही.
‘नवरी मिळे हिटलरला’ मध्ये ट्विस्ट
आता झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, आजी एजेच्या हातात एक फाइल देते. ती फाइल पाहिल्यानंतर एजे विचारतो की काय झालं? त्यावर आजी म्हणते की बघ, तुला कळेल. ती फाइल उघडून पाहिल्यानंतर एजेच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचे दिसत आहे.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की लीला देवाशी बोलत आहे. ती म्हणते की पार्टनर प्लीज माझी शंका खोटी ठरू दे. आता आणखीन कुठलाही धक्का पचवायची ताकद माझ्यात नाही. त्यानंतर ते हातातील प्रेग्नन्सी किट पाहते. त्यानंतर ती आनंदाने रडत म्हणते की मी प्रेग्नंटआहे.
आता लीलाची आनंदाची बातमी ऐकल्यानंतर घरातील सर्वजण तिच्या आनंदात सहभागी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एजे व लीला हे पती-पत्नी आहेत. लीला ही एजेची दुसरी पत्नी आहे. वयाने कमी असलेली लीला सासू म्हणून दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांना मान्य नाही.
काही दिवसांपूर्वीच एजेची पहिली पत्नी अंतरा जहागीरदारांच्या कुटुंबात परतली आहे. तिच्या येण्याने लीला आता घरातून बाहेर जाईल, अशी आशा सुनांना वाटत आहे. या सगळ्यात आजी मात्र लीलावर प्रचंड प्रेम करते. अभिराम व लीलाचे नाते टिकावे, यासाठी प्रयत्न करते. आता मालिकेत पुढे काय होणार, अंतराला तिचा भूतकाळ आठवणार का, हे पाहणे महत्वाचे ठरवणार आहे.