अभिनेत्री, निर्मिती श्वेता शिंदे हिची नवी निर्मिती असलेली मालिका ‘लाखात एक आमचा दादा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत ‘झी मराठी’चा जुना व लोकप्रिय चेहरा अभिनेता नितीश चव्हाण झळकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेचे नवनवीन प्रोमो प्रदर्शित होत आहे. आता आणखी एक नवा दमदार प्रोमो प्रदर्शित झाला असून यातून मुख्य अत्रिनेत्रीची झलक पाहायला मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी ‘झी मराठी’ वाहिनीवर येणाऱ्या ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री श्वेता खरात झळकणार असल्याचं समोर आलं होतं. ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेतील संजीवनीची मैत्रीण आणि ‘मन झालं बाजिंद’ मधील कृष्णा म्हणून काम केलेली श्वेता व नितीश यांची नवी जोडी पाहायला मिळणार असल्याचं ‘मराठी टीव्ही इन्फो’ इन्स्टाग्राम पेजवर सांगण्यात आलं होतं. पण आता श्वेताच्या ऐवजी दुसरी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री झळकणार असल्याचं नव्या प्रोमोमधून निश्चित झालं आहे.

हेही वाचा – गर्भवती असताना मराठी अभिनेत्रीला लागले बिअर प्यायचे डोहाळे! स्वतः खुलासा करत म्हणाली, “मी नऊ महिने बिअर अन्…”

याआधी मालिका, चित्रपट, अल्बम साँगमध्ये झळकलेली अभिनेत्री दिशा परदेशी ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नव्या प्रोमोनुसार नितीश म्हणजेच सूर्यादादाची बालपणीपासूनची मैत्रीण तुळजाच्या भूमिकेत दिशा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेत नितीश व दिशा ही नवी जोडी दिसणार आहे.

हेही वाचा – अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेच्या घरावर मोठा दरोडा, ‘इतकं’ तोळं सोनं केलं लंपास अन्…

हेही वाचा – Video: संतोष जुवेकरची मराठी मालिकाविश्वात पुन्हा दमदार एन्ट्री, झळकणार ‘या’ लोकप्रिय मालिकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘लाखात एक आमचा दादा’मधील सूर्यादादाच्या चार बहिणी कोण असणार? याचा खुलासा प्रोमोमधून झाला होता. सूर्यादादाच्या चार बहिणींची नावं तेजश्री, राजश्री, भाग्यश्री आणि धनश्री अशी आहेत. अभिनेत्री कोमल मोरे (तेजश्री), समुद्धी साळवी (धनश्री), इशा (राजश्री), जुई तनपुरे (भाग्यश्री) या चारजणी बहिणींच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. पण अद्याप ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेची सुरू होण्याची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आलेली नाही. दुसऱ्याबाजूला मालिकेच्या दमदार प्रोमोंनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.