‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेतील सूर्या व त्याच्या बहि‍णींची बॉण्डिंग प्रेक्षकांना आवडते. सूर्या ज्या पद्धतीने त्याच्या बहि‍णींची काळजी घेतो, त्यांच्यावर प्रेम करतो, त्या कोणत्या संकटात अडकू नये, म्हणून तो सतत प्रयत्न करताना दिसतो. त्याच्या बहिणीदेखील त्याच्यावर अतोनात प्रेम करताना दिसतात. त्याला त्रास होऊ नये, मनस्ताप होऊ नये, याची त्या काळजी घेताना दिसतात. सूर्याप्रमाणेच प्रेमळ असणाऱ्या या बहिणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. याबरोबरच मालिकेतील कलाकार हे मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतातच, पण सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधूनदेखील ते भेटीला येतात. आता सूर्या दादा व त्याची बहीण राजश्री यांचा एक व्हिडीओ प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

काय म्हणाले नेटकरी?

लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सूर्याची भूमिका नितीश चव्हाणने निभावली आहे, तर राजश्रीची भूमिका ईशा संजयने निभावली आहे. नितीश चव्हाणने ईशाबरोबर एक डान्स केला आहे, ज्यामध्ये तो मजेशीर पद्धतीने डान्स स्टेप करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नितीश चव्हाणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना नितीशने सूर्या दादाची पुकी साईड (Pookie Side) असे लिहिले आहे. नितीश व ईशा दोघेही हा डान्स करताना गोड दिसत आहेत. या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्याचे दिसत आहे. नितीश चव्हाणने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. “अजिंक्य तू कशाला दुसऱ्या मुलीच्या नादाला लागतोयस, का नाव सांगू शीतलला?”, “काय राव फौजी”, अशा कमेंट पाहायला मिळत आहेत. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.

नितीश चव्हाणने याआधी ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत काम केले आहे. नितीश चव्हाणने यामध्ये अजिंक्य ही भूमिका साकारली होती, तर अभिनेत्री शिवानी बावकरने शीतल ही भूमिका साकारली होती. शीतल-अजिंक्य या जोडीला प्रेक्षकांकडून मोठे प्रेम मिळाल्याचे पाहायला मिळाले होते.

हेही वाचा: “फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘लागिरं झालं जी’ मालिकेनंतर तो पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सूर्यादादाची भूमिकासुद्धा प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसत आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सध्या तुळजाच्या हाती शत्रूविरूद्ध पुरावा सापडल्याचे दिसत आहे, तर भाग्यावर मोठे संकट आल्याचे दिसत आहे. आता शत्रूचा खरा चेहरा डॅडींसमोर येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.