Lakshmi Niwas fame Bhawana’s look on Navratri: लोकप्रिय अभिनेत्री अक्षया देवधर सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत काम करताना दिसत आहे. या आधी तिने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली होती. अंजली व राणा दादाच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते.
आता अक्षयाने ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत भावना ही भूमिका साकारली आहे. लक्ष्मी व श्रीनिवास यांची मोठी मुलगी, जबाबदार, शांत, संयमी अशी ही भावना सर्वांच्या मनाचा विचार करत असल्याचे दिसते. वय झाल्यानंतर लग्न न झाल्याने तिला अनेकांचे टोमणे सहन करावे लागले.
जेव्हा तिचे लग्न ठरले त्यावेळी लग्नादिवशीच श्रीकांतचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याची मुलगी आनंदीची जबाबदारी भावनाने स्वीकारली आणि ती आनंदीची आई झाली. त्यानंतर सिद्धूबरोबर तिचे लग्न झाले. लग्नानंतर तिला दररोज विविध परीक्षांना सामोरे जावे लागत आहे. या सगळ्यात तिला सिद्धूची साथ मिळत आहे.
आता भावना तिच्या मालिकेमुळे नाही तर तिच्या नवरात्रीच्या आठव्या दिवशीच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर भावनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तयार होत असल्याचे पाहायला मिळाले.
व्हिडीओमध्ये सुरुवातीला ती मेकअप करताना दिसत आहे. त्यानंतर तिने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. याबरोबरच तिने दागिनेही घातले आहेत. भावना या लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “नवरात्रीच्या आठव्या दिवसासाठी अशी सजली भावना”, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
आता भावनाचा हा लूक पाहून अनेकांनी कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे. या सगळ्यात भावनाची आई म्हणजे अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी कौतुक करत “सुंदरी गं माझी” असे लिहिले आहे. तर अनेकांनी, “सुंदर”, “माझी सुंदर मुलगी”, “सुंदरी”, अशा कमेंट्स केल्या आहेत; तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

आता ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.