Sachin Deshpande Shares Photos With Sharayu Sonawane: काही मालिका या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अशा मालिकेतील पात्रे प्रेक्षकांची लाडकी होतात. अशाच लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘पारू’ ही आहे. या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येताना दिसतात.

‘पारू’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वीच या मालिकेत किर्लोस्कर कुटुंबावर संकट आले होते. प्रीतमवर एका मुलीने आरोप लावल्याचे पाहायला मिळाले. मात्र, अहिल्यादेवी किर्लोस्करने तिच्या मुलाला निर्दोष सिद्ध केले. आता मात्र पारूच्या जीवावर संकट आल्याचे पाहायला मिळाले. या मालिकेत पारू ही भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणेने साकारली आहे, तर आदित्य ही भूमिका अभिनेता प्रसाद जवादेने साकारली आहे.

आता अभिनेत्री शरयू सोनावणे ही मालिकेमुळे नाही तर सहकलाकाराने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत अभिनेता सचिन देशपांडे दिसला होता. त्याने मालिकेत अजय ही भूमिका साकारल्याचे पाहायला मिळाले. आता अभिनेत्याने सोशल मीडियावर शरयू व मालिकेतील इतर कलाकारांबरोबर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो मालिकेच्या सेटवरील असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘पारू’ फेम अभिनेत्याने वाकडतोंडी म्हणत शेअर केली पोस्ट

सचिनने हे फोटो शेअर करताना ‘वाकडतोंडी’ हे कॅप्शन दिले आहे. तसेच पुढे हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. त्याचे हे कॅप्शन लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या या पोस्टवर शरयूसह चाहत्यांनी कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे. शरयूने सचिनने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करीत लिहिले, “स्वत:चं किती कौतुक करशील”, असे लिहित तिने पुढे हसण्याच्या इमोजी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.

एका नेटकऱ्याने लिहिले, “तुमची मजा अशीच चालू राहूदे, सर्वांचं खूप छान बाँण्डिंग आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “किती बदमाश माणूस आहे”, तर आणखी एका नेटकऱ्याने वाह! छान, असे म्हणत कमेंट केली आहे. इतर काही नेटकऱ्यांनी हार्ट इमोजी शेअर केली आहे.

मालिकेबरोबरच अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील प्रेक्षकांच्या संपर्कात असते. तिने शेअर केलेले व्हिडीओ, डान्स, रील यांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते.

शरयू सोनावणे ही पारू मालिकेतून घराघरांत पोहोचली आहे. तिला या मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली आहे. कमी शिकलेली, गावाकडे वाढलेली, संस्कारी, प्रेमळ, काळजीवाहू तितकीच खंबीर, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत असणारी ही पारू सर्वांची लाडकी आहे. ही पारू वडिलांप्रमाणे किर्लोस्कर कुटुंबीयांप्रती समर्पित असल्याचे पाहायला मिळते. किर्लोस्कर कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी पारू सतत प्रयत्न करताना दिसते. जर त्यांच्यावर कोणते संकट आलेच, तर ती स्वत:चा जीव धोक्यात घालून किर्लोस्करांचे संरक्षण करते. आता अहिल्यादेवी व श्रीकांत किर्लोस्कर यांचा मुलगा आदित्य व पारू एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे मालिकेत पाहायला मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता मालिकेत पुढे काय ट्विस्ट येणार, पारू व आदित्यच्या नात्याबद्दल सर्वांना कधी समजणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.