‘पारू’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री शरयू सोनावणे नेहमी चर्चेत असते. ‘पारू’ मालिकेत तिने साकारलेली पारू प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडली आहे. तिची ही मालिका आता लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सध्या मालिकेत भव्य मंगलकार्य पाहायला मिळत आहे. ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा महासंगम आहे. एकाबाजूला आदित्य-अनुष्का आणि दुसऱ्या बाजूला जयंत-जान्हवी यांचा लग्नसोहळा सुरू आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकार सध्या खूप चर्चेत आहेत.

नुकताच ‘पारू’ मालिकेतील पारू म्हणजे अभिनेत्री शरयू सोनावणेने ‘कलाकृती मीडिया’शी संवाद साधला. यावेळी शरयूला खास उखाणा घ्यायला सांगितला. तेव्हा तिने स्वतःच्या टोपण नावाचा खुलासा करत हटके उखाणा घेतला.

शरयू सोनावणे म्हणाली, “मला घरी लाडाने मॅग्गी म्हणतात आणि माझ्या नवऱ्याचं नाव आहे जयंत लाडे. त्यामुळे दोघांच्या नावावरून एक उखाणा आहे, जो मी लग्नाच्या दुसऱ्यादिवशी जी पूजा असते. त्यावेळी घेतला होता. संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा, मॅग्गीने जर पसरा गेला, तर जयंतने तो आवरायचा.

दरम्यान, शरयू सोनावणेने २०२३मध्ये जयंत लाडेशी लग्नगाठ बांधली होती. हे लग्न तिने वर्षभर सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने लग्न झाल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हापासून ती सातत्याने नवऱ्याबरोबर फोटो शेअर करत असते.

शरयू सोनावणेचा नवरा कोण आहे?

शरयू सोनावणेचा नवरा जयंत लाडे मराठी सिनेसृष्टीत काम करत असून तो एक फिल्ममेकर, निर्माता आहे. अभिनेता उमेश कामत, पुष्कर श्रोत्री आणि स्पृहा जोशी अभिनीत ‘अ पेईंग घोस्ट’ चित्रपटाच्या निर्मातीची धुरा जयंतने सांभाळली होती. याशिवाय उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, संजय जाधव, भरत गणेशपुरे अभिनीत ‘सूर सपाटा’ या चित्रपटाची निर्मिती देखील शरयूच्या नवऱ्याने केली होती. या चित्रपटात शरयू सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पारू’ मालिकेत सध्या काय सुरू आहे?

‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या महासंगममध्ये जान्हवीच्या लग्नात भावना आणि सिद्धू यांच्यात गैरसमज निर्माण होणार आहेत. सिद्धूला असं वाटतंय की आदित्यचं भावनाचा नवरा आहे आणि भावना एका मुलीची आई आहे. यामुळे तो अस्वस्थ आहे. सिद्धूला अजून एक धक्का बसतो जेव्हा त्याला समजतं की लक्ष्मी हीच सिंचनाची सासू आहे. हे ऐकून तो चक्रावून जातो. विश्वाही या लग्नासाठी आलाय. तिथे त्याची प्रीतमशी भेट होते. ते दोघं मिळून हे भव्य मंगलकार्य बिघडवायचं ठरवतात. मात्र, विश्‍वा जान्हवीच्या चेहऱ्यावर आनंद बघून विचार बदलतो. या प्रसंगी पारू आणि सिद्धूची मैत्री होते, जिथे सिद्धू आदित्यचं अपहरण करतो. यावेळी पारू सिद्धूला प्रेमाविषयीचे विचार सांगते. आपलं प्रेम आपल्याला मिळायलाच पाहिजे, हा हट्टास चुकीचा असल्याचं पारू सिद्धूला सांगते. पण, पारूचे हे विचार सिद्धूला पटतील की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.