Zee Marathi Paaru Serial : ‘पारू’ मालिकेत लवकरच एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. गेल्या वर्षभरापासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते… तो क्षण मालिकेत अखेरिस येणार आहे. आदित्यवर चिडून पारू किर्लोस्करांचं घर सोडण्याचा निर्णय घेते.

‘पारू’ एकटी आपल्या गावी येऊन राहते. तर, दुसरीकडे पारू घरात नसल्याने आदित्य बिथरून जातो. काही करून मी पारूला घरी परत आणणार असा निर्धार तो करतो. याबद्दल तो अहिल्यादेवीला सांगतो. अहिल्या, पारूला ताबडतोब फोन करते आणि किर्लोस्करांकडे पुन्हा ये असं सांगते. यावेळी पारूचे बाबा देखील उपस्थित असतात.

पारू फोनवर मी परत येणार नाही असा निरोप देते. “नाही देवीआई मी परत येणार नाही, बाबा मला तुझ्यासारखं चाकरी करत माझं पुढचं आयुष्य घालवायचं नाही.” असं रडत-रडत पारू अहिल्यादेवीला सांगते. यानंतर आदित्य स्वत: पारूला न्यायला जाणार आहे. आदित्य बुजगावण्याचं रुप घेऊन त्याच्या लाडक्या पारूची मनधरणी करणार आहे.

आदित्यवर असलेलं प्रेम, अहिल्यादेवींचा आदेश या सगळ्या गोष्टींचा विचार करून अखेरीस पारू किर्लोस्करांच्या घरी परतणार आहे. रुसवा सोडून पारू पुन्हा एकदा घरी आल्याने आदित्य प्रचंड आनंदी होतो. तो पारूला खास गिफ्ट देणार आहे.

आदित्यने पारूसाठी प्रेमाची भेट म्हणून खास कानातले आणलेले असतात. पारू सुद्धा या गिफ्टचा स्वीकार करते हे पाहून आदित्य आनंदाने उड्या मारू लागतो…त्यानंतर पारूने मागे वळून पाहिल्यावर स्वत:ला सावरतो. आता या दोघांच्या प्रेमकहाणीला मालिकेत हळुहळू सुरुवात होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘पारू’ मालिकेचा हा विशेष भाग ४ एप्रिलला संध्याकाळी ७.३० वाजता प्रक्षेपित केला जाणार आहे. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये आनंद व्यक्त केला आहे. “मस्त प्रोमो”, “हा भाग पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे”, “पारू सुंदर दिसतेय”, “पारू मालिका आता खरी रंजक वळणावर आलीये”, “सुंदर वळण आलंय…” अशा प्रतिक्रिया यावर आल्या आहेत.