अनुष्कामुळे किर्लोस्करांच्या आयुष्यात विविध घटना घडताना दिसत आहेत. ‘पारू'(Paaru) या मालिकेतील किर्लोस्कर कुटुंबावर संकट आल्याचे पाहायला मिळत आहे. काही गुंडांनी प्रीतमला बेदम मारल्याचे पाहायला मिळाले. आता त्याला कोण वाचवणार, मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. आता मालिकेत ट्विस्ट येणार असून, पारूचा भूतकाळ तिच्यासमोर येणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये पारूला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.

पारूचे सत्य सर्वांसमोर येणार का?

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, प्रीतम बाहेरून घरात येतो. प्रीतमच्या चेहऱ्यावर त्याला मार लागल्याची खूण दिसत आहे. त्याला पाहताच आदित्य त्याला विचारतो की, प्रीतम तू कसा आहेस? तुला कोणी वाचवलं? त्याचा तो प्रश्न ऐकल्यानंतर प्रीतम स्मित करीत एका व्यक्तीकडे बोट दाखवतो. त्याच वेळी पारू पाणी घेऊन येत असते.

प्रीतमने बोट दाखवलेल्या व्यक्तीकडे पाहताच पारूला मोठा धक्का बसतो. तिच्या हातातून ग्लास खाली पडतात आणि ते फुटतात. प्रीतम, प्रिया व आदित्य सगळे पारू, असे म्हणत तिच्याकडे पाहतात. ती व्यक्ती म्हणजे हरीश असतो, ज्याच्याबरोबर पारूचे लग्न ठरले होते. हा प्रोमो शेअर करताना, ‘होणार जुन्या नात्याचा नवा खुलासा’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

पारू या दाखविल्याप्रमाणे, अहिल्यादेवीने पारू व हरीशचे लग्न ठरवले होते. त्यांच्या लग्नाचे काही विधी पार पडले होते. मात्र, ऐन लग्नाच्या वेळी हरीश गायब झाला. पारूने हरीशकडे तिच्या आदित्यबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. प्रॉडक्टच्या जाहिरातीच्या शूटिंगमध्ये आदित्यने जेव्हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले तेव्हा ते सर्व तिने खरे मानले, असे तिने हरीशला सांगितले होते. त्यानंतर हरीश अचानक लग्नातून गायब झाल्याचे पाहायला मिळाले होते. आदित्यने त्याचा खूप शोध घेण्याचा प्रयत्नही केला होता; मात्र तो सापडला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता हरीश पुन्हा परतल्याने पारूचे सत्य सर्वांसमोर येणार का, पारू पुढे काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.